Samsung Drone Camera Phone: तुम्ही ड्रोन कॅमेरा तर नक्कीच पाहिला असेल, पण एखाद्या फोनमधून ड्रोन कॅमेरा निघताना कधी पाहिला नसेल. आता हि कल्पना लवकरच सत्यात उतरलेली पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कंपनी सॅमसंग ड्रोन कॅमेरा स्मार्टफोनवर काम करत आहे. असे म्हंटले जात आहे कि याचे काम पूर्ण झाले आहे. 2024 मध्ये हा फोन जागतिक स्तरावर लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये फ्रंट कॅमेरा नसेल, त्याऐवजी फोनच्या वरच्या भागामध्ये एक मिनी ड्रोन कॅमेरा दिला जाईल. लिक झालेल्या पिक्चर्समध्ये काही फीचर्स समोर आले आहेत. चला तर पाहूयात.
Samsung Drone Camera Phone लाँच डेट, टाईम आणि किंमत
सॅमसंगकडून अजून या फोनबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. लिक माहितीनुसार हा फोन 2024 च्या अखेरीस जागतिक स्तरावर लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय मार्केटमध्ये या फोनची किंमत 1,49,000 इतकी असेल.
सॅमसंग ड्रोन कॅमेरा फोन डिस्प्ले
या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X मिळेल, ज्यामध्ये 1440 x 3088 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 500 ppi पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. त्याचबरोबर HDR10+ चा सपोर्ट आणि 120 गिगा हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळेल. ज्यामुळे फोनचा गेमिंग आणि मल्टिमीडिया परफ़ॉरमंस खूपच दर्जेदार होईल. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ चे प्रोटेक्शन देखील दिले जाईल.
सॅमसंग ड्रोन कॅमेरा फोनची बॅटरी आणि चार्जर
फोनमध्ये 5000 mAh ची मोठी बॅटरी मिळेल, ज्यासोबत 65W चा फास्ट चार्जर देखील दिला जाईल, हा फोन फक्त 32 मिनिटांमध्ये फूल चार्ज होईल. यासोबतच 25W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंगचा पर्याय देखील यामध्ये पाहायला मिळेल.
सॅमसंग ड्रोन कॅमेरा फोन कॅमेरा
या स्मार्टफोनचा कॅमेरा हेच याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, कारण फोन मध्ये ड्रोन कॅमेरा (Samsung Drone Camera Phone) दिला जाईल, त्याच्या मागील बाजूस चार कॅमेऱ्यांचा सेटअप असेल. प्रायमरी कॅमेरा हा 108 मेगापिक्सेल वाइड अँगल कॅमेरा असेल, दुसरा 48 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल असेल. 12 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स, आणि 12 मेगापिक्सेल मायक्रो लेन्स उपलब्ध असतील. यामध्ये काही खास मोड्स देखील दिले जातील.
फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एक 200 वाईड अँगल कॅमेरा देखील दिला जाईल, जो मिनी ड्रोन (Samsung Drone Camera Phone) असेल. हा मिनी ड्रोन फोनच्या वरच्या भागामध्ये असेल, जो बाहेर काढून तुम्ही हवेमध्ये उडवून फोटो घेऊ शकता. या कॅमेऱ्याने तुम्ही 8K पर्यंतचा व्हिडीओ देखील शूट करू शकता.
Samsung Drone Camera Phone स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: 6.8 इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले
- रीफ्रेश रेट: 120Hz
- ब्राइटनेस: 1600 nits
- रॅम: 12GB LPDDR5X
- स्टोरेज: 512GB UFS 3.1
- चिपसेट: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन
- वॉटर रेझीस्टंट
- CPU: हेक्सा-कोर (3.5 ते 4.0 GHz)
- प्रोटेक्शन: कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस+
- कस्टम UI: Samsung UI
- रियर कॅमेरा: 108MP वाइड अँगल + 48MP अल्ट्रा वाइड अँगल + 12MP टेलीफोटो + 12MP मायक्रो
- फ्रंट कॅमेरा: 200MP वाइड अँगल ड्रोन कॅमेरा
- बॅटरी: 5000 mAh
- चार्जर: 65W फास्ट चार्जर
- वेट: 266 ग्रॅम
- रंग: ब्लॅक, व्हाईट, ब्लू
- कनेक्टिव्हिटी: भारतात 5G सपोर्टेड, 4G, 3G, 2G
- सेन्सर: फिंगरप्रिंट सेन्सर, लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर, कंपास, जायरोस्कोप
- किंमत: 1,49,000 रुपये
Also Read: Apple Watch Ultra सारखे स्मार्टवॉच खरेदी करा फक्त 2000 मध्ये, घरबसल्या करा ऑनलाईन ऑर्डर