iQOO 12 5G भारतामध्ये लाँच झाला आहे. कंपनीने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या फोनच्या प्रोसेसरवर कंपनीने खूप काम केले आहे. हेच कारण आहे कि याचा स्पीड खूपच जबरदस्त मिळणार आहे. 12 सिरीजच्या या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 वापरण्यात आला आहे.
हा पहिला फोन आहे ज्यामध्ये Snapdragon 8 Gen 3 चा वापर करण्यात आला आहे. कंपनीने दावा केला यामध्ये कॅमेरा देखील खूपच चांगला आहे. वाइड आणि अल्ट्रा वाइड वर देखील हा खूप क्लियर पिक्चर क्लिक करेल. सामान्यत: असे दिसून येते कि स्मार्टफोन सतत वापरल्यानंतर गरम होतो. यामुळेच यामध्ये कूलिंग टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला आहे, जो फोनचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम करतो.
iQOO 12 प्राईस
फोनच्या प्राईसबद्दल बोलायचे झाले तर 12GB + 256GB स्टोरेज साठी 52,999 रुपये खर्च करावे लागतील. तर दुसरा व्हेरीयंट 16GB+512GB स्टोरेज सोबत येतो आणि यासाठी 57,999 रुपये खर्च करावे लागतील. तथापि सध्या यावर अनेक ऑफर्स सुरु आहेत. फोनची पहिली विक्री 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
iQOO 12 डिस्काउंट
सध्या यावर डिस्काउंट ऑफर्स देखील सुरु आहेत. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 3,000 रुपयांचा वेगळा डिस्काउंट मिळू शकतो. जर तुमच्याजवळ कार्ड्सचा पर्याय नसेल तर एक्सचेंज बोनस मिळवू शकता. जुना स्मार्टफोन परत करून 3,000 डिस्काउंट रुपयांची सूट मिळेल. तर Vivo kinva किंवा iQOO चा स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 5000 पर्यंत डिस्काउंट मिळेल.
iQOO 12 5G मध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. शिवाय 144Hz चा रिफ्रेश रेट देखील मिळतो. डिस्प्लेमध्ये वेट टच टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. जर तुम्ही ओल्या हातांनी देखील वापरलात तरी फोनचा डिस्प्ले उत्तम प्रकारे काम करेल. वजनाने हलका असल्याने फोन सतत वापरणे सोपे होते.
Also Read: सॅमसंग लाँच करत आहे जगातील पहिला ड्रोन कॅमेरा फोन, पहा जबरदस्त फीचर्स