Gold Rate Today: देशभरामध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे आणि अशामध्ये सोने-चांदीमध्ये चकाकी पाहायला मिळत आहे. सण आणि लग्नसराई दरम्यान सोने-चांदीची मागणी वाढली आहे. ज्यामुळे दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे फ्युचर्स तसेच सराफ बाजारातील किमतींमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे.
गुरुवारी सराफा बाजारामध्ये तुफानी तेजी पाहायला मिळाली. MCX वर सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये 2-4 टक्के मजबुती आहे. देशांतर्गत मार्केटसोबत परदेशी मार्केटमध्ये विक्रमी तेजी दिसत आहे. COMEX वर सोन्याची किंमत प्रती औंस 2050 डॉलर वर ट्रेड करत आहे. सोने चांदीच्या दरामध्ये (Gold Rate Today) मोठी वाढ होण्याचे कारण म्हणजे यूएस सेंट्रल बँकेचा निर्णय, ज्यामध्ये व्याज दरांमध्ये कपातीचे संकेत मिळाले आहेत.
देशामध्ये सोने झाले महाग – Gold Rate Today
देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या दरामध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याच्या भाव 1200 रुपयांनी वाढून 62400 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. चांदीचा दर देखील सुमारे 4 टक्क्यांनी मजबूत होऊन 74300 रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे. आज चांदीच्या दरामध्ये 2700 रुपयांनी वाढ झाली.
विदेशी बाजारामध्ये सोने-चांदी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2.5 टक्क्यांनी वाढून 2050 प्रती औंस झाला आहे. चांदीच्या किंमतीत देखील 5 टक्क्यांनी जबरदस्त वाद होऊन 24 डॉलर प्रती औंस झाली आहे.
सोन्या चांदीच्या दरामध्ये का आहे तेजी?
सराफा बाजारामध्ये आलेल्या तेजीचे मुख्य कारण US FED चा निर्णय आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय बँकेने सलग तिसऱ्यांदा दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे 2024 मध्ये कपात होण्याचे संकेत आहेत. या अंतर्गत व्याजदर 3 वेळा कमी करता येतात. परिणामी, यूएस बाँड यील्ड आणि डॉलर इंडेक्स घसरला, जो चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.