IPL Auction 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मंगळवारी दुबईमध्ये झालेल्या लिलावात (IPL Auction 2024) मेरठच्या खेळाडूवर पैशांचा वर्षाव झाला. मेरठचा युवा खेळाडू समीर रिज्वी ला 8 करोड़ 40 लाख मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या टीममध्ये सामील केले. ज्यानंतर त्याच्या घरामध्ये जल्लोष सुरु झाला. कुटुंबातील लोकानी ढोलताशाच्या तालावर नाचत आनंद साजरा केला. समीरचे अभिनंद करण्यासाठी त्याच्या घरी एकच गर्दी झाली.
समीर रिज्वी आणि त्याचे काका चाचा तनकीब अख्तर यांना त्यांच्या भावनांना आवर घालता आला नाही, जेव्हा मंगळवारी आईपीएल लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टाइटंस आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान या युवा खेळाडूसाठी बोली लागली. उत्तर प्रदेशच्या या 20 वर्षीय खेळाडूला शेवटी 8.40 करोड रुपयांना चेन्नई सुपर किंग्स ने खरेदी केले. रिज्वी कुटुंबावर अनेक संघर्ष केल्यानंतर हि वेळ आली आहे, कारण त्याच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्यामुळे काम करू शकत नाहीत. टीन वर्षापूर्वी ब्रेन हॅमरेजचा त्यांना सामना करावा लागला होता. आता त्यांचा मुलगा त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यासाठी सक्षम आहे.
Also Read: कोण आहे Vrinda Dinesh? 10 लाख बेस प्राईस असलेल्या खेळाडूला मिळाले तब्बल 1.30 करोड
IPL Auction 2024: समीरची बेस प्राईस 20 लाख
स्टार क्रिकेटर समीर रिज्वीची बेस प्राईस (IPL Auction 2024)20 लाख ठेवली गेली होती. समीरच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे चेन्नई सुपर किंग्स त्याच्यावर सर्वात जास्त बोली लावली. समीरवर चेन्नई सुपर किंग्स शिवाय सन राइजर्स हैदराबादने देखील खूप बोली लावली. हि बोली 8 करोड 40 लाख पर्यंत जाऊन थांबली. आईपीएल च्या 16 व्या सीजनमध्ये समीर आता चेन्नई सुपर किंग्स साठी फलंदाजी करणार आहे.
सिक्सर किंग म्हणून ओळख
समीर रिज्वी ने अतापार्यंत आपल्या करियरमध्ये 2 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यूपी टी20 लीग मध्ये समीरने कानपुर सुपरस्टार्स साठी सर्वात जास्त सिक्स मारले होते. पी टी20 लीग मध्ये सर्वात जास्त धावा बनवणारा तो तिसरा खेळाडू राहिला होता. टूर्नामेंट मध्ये समीरने 2 शतके ठोकली होती. शिवाय एक अर्धशतक देखील केले होते. यूपी लीग च्या 10 सामन्यांमध्ये समीरने 38 चौकार आणि 35 षटकार मारले होते. त्याला उजव्या हाताचा रैना म्हणून देखील ओळखले जाते.
आक्रमक अंदाजामुळे चेन्नईने केला पैशांचा पाऊस
टूर्नामेंट मध्ये समीरने खूपच आक्रमक फलंदाजी केली होती. ज्यानंतर सर्वांची नजर त्याच्यावर होती आता चेन्नई टीमने याला आपल्या संघात घेतले आहे. त्याने नऊ डावांमध्ये झंझावाती शतकांच्या जोरावर 455 धावा केल्या होत्या. समीरने त्याच्या करियरमध्ये आतापर्यंत 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, 9 डावात फलंदाजी करताना त्याने 49.16 च्या सरासरीने आणि 134.70 च्या स्ट्राइक रेटने 295 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत.