Nava Gadi Nava Rajya: झी मराठी वरील ‘नवा गडी नवं राज्य’ सिरीयल लवकरच दर्शकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिरीयलचा शेवटचा भाग 23 डिसेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे सध्या सिरीयल मधील कलाकार भावूक होत आपल्या भावना सोशल मिडियावर शेयर करत आहेत.
कश्यप परुळेकरने शेयर केला व्हिडीओ – Nava Gadi Nava Rajya
अभिनेता कश्यप परुळेकरने नुकतेच सेटवरचा त्यांच्या शेवटच्या दिवसातील एक व्हिडीओ शेयर केला होता. “‘नवा गडी नवं राज्य’ अध्याय समाप्त…कळावे, लोभ असावा…” असे कॅप्शन लिहित त्याने व्हिडीओ शेयर केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते भावूक होत त्याच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त करत आहेत.
व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स – Nava Gadi Nava Rajya
कश्यपच्या व्हिडीओ वर चाहते कमेंट करून सिरीयल बंद करू नका, सिरीयलचा दुसरा भाग लवकरच आणा अशा कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि अर्धवट सिरीयल का बंद करत आहात, बंद करू नका. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि तुम्ही नवीन सिरीयल सुरु करा प्लीज. तर एका युजरने कमेंट करत लिहिले आहे कि प्लीज सिरीयल सुरु ठेवा खूपच छान सिरीयल आहे.
हेही वाचा: नागराज मंजुळे यांच्या पत्नीला पाहिलंत का? Nagraj Manjule Wife पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर…
एका युजरने तर लिहिले आहे कि, हि सिरीयल साम्पेते आहे हे ऐकून खूपच दुःख झाले. मी फक्त हि एकमेव सिरीयल पाहत होते. अगदी पहिल्या एपिसोडपासूनच तुम्ही सगळे आमचे झालात, अगदी जवळचे कोणी तरी दूर जातेय आता रोज भेटणार नाहीत तुम्ही याचे खूप वाईट वाटते आहे. तुम्ही सगळ्यांनी अथक परिश्रम घेऊन तुमचे प्रत्येकाचे पत्र जिवंत केलेत तुम्ही अभिनय करत आहात असे कधी वाटले नाही. लवकरात लवकर तुम्ही नवीन प्रोजेक्ट मघ्ये पार्ट यावे अशी इच्छा. तुमच्या सगळ्यांच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) सिरीयल 8 ऑगस्ट 2022 पासून झी मराठी वर प्रसारित झाली होती. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे या कलाकारांनी आपल्या अभिनयाने दर्शकांच्या मनामध्ये घर निर्माण केले. सिरीयल आला अंतिम टप्प्यामध्ये आहे. 23 डिसेंबर रोजी या सिरीयलचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.