Ratan Tata 86th Birthday: देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. अब्जाधीश उद्योगपती आणि अतिशय उदार व्यक्ती अशी ओळख असलेल्या रतन टाटा यांचा 86 वा वाढदिवस (Ratan Tata 86th Birthday) आहे. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एकीकडे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक रंजक किस्से आहेत यातीलच एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत.
2012 पर्यंत होते टाटा ग्रुपचे अध्यक्ष (Ratan Tata 86th Birthday)
रतन टाटा (Ratan Tata) यांना कोणाच्याही ओळखीची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून टाटा कुटुंब कॉर्पोरेट जगतात आपला ठसा उमटवत आहे. ते 1991 पासून ते 2012 पर्यंत टाटा ग्रुपचे अध्यक्ष राहिले आणि यादरम्यान तिनी बिजनेस सेक्टरमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करत सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले. रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व पाहिल्यास ते केवळ बिजनेसमनच नाहीत तर एक उदार व्यक्ती, आदर्श आणि लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत.
90 च्या दशकातील हि घटना (Ratan Tata 86th Birthday)
हि घटना 90 च्या दशकातील आहे, जेव्हा Tata Sons चे चेयरमन रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्सने आपली कार टाटा इंडिका (Tata Indica) लाँच केली होती. पण त्यावेळी टाटाच्या कार्सचा सेल म्हणावा तितका झाला नाही जितका प्रतिसाद रतन टाटा यांना हवा होता. टाटा इंडिकाला कमी प्रतिसाद आणि सतत वाढत चाललेल्या तोट्यामुळे त्यांनी पॅसेंजर कार डिव्हिजन (Passenger Car Business) विकण्याच्या निर्णय घेतला होता नी यासाठी त्यांनी अमेरिकन कार निर्मिती कंपनी Ford Motors सोबत चर्चा केली होती.
फोर्ड चेयरमन Bill Ford सोबत मिटिंग (Ratan Tata 86th Birthday)
जेव्हा रतन टाटाने आपल्या पॅसेंजर कार डिव्हिजन ला Ford Motors ला विकण्याच्या निर्णय घेतला तेव्हा Ford ने चेयरमन Bill Ford यांची खिल्ली उडवली होती. बिल फोर्डने त्यांना म्हंटले होते कि तुम्हाला काहीच माहिती नव्हती तर तुम्ही पॅसेंजर कार डिव्हिजनची सुरुवात का केली होती? बिल इथेच थांबले नाहीत तर त्यांनी म्हंटले कि आम्ही तुमच्या बिजनेसला खरेदी केले तर आमचे तुमच्यावर उपकार होतील. रतन टाटा यांच्या मनामध्ये हि गोष्ट घर करून राहिली, पण त्यांनी स्वभावानुसार लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही आणि भारतामध्ये परत आले.
भारतात परतताच घेतला मोठा निर्णय (Ratan Tata 86th Birthday)
Bill Ford सोबत मिटिंगनंतर त्यांनी पॅसेंजर कार डिव्हिजन विकण्याच्या निर्णय बदलला आणि नंतर भारतामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी मेहनत करू लागले. त्यांनी सिद्ध केले कि अपयश हि यशाची पहिली पायरी असते. त्यांनी आपला संपूर्ण फोकस Tata Motors ला नवीन उंचीवर नेण्यासाठी लावला आणि एका दशकापेक्षा कमी काळामध्ये त्यांनी स्वतःला या सेक्टरचा राजा बनवून फोर्डच्या वाईट वागणुकीचा असा बदल घेतला कि जो नेहमीच लक्षात ठेवला जाईल.
9 वर्षात फोर्डला केले नतमस्तक
या गोष्टीला आता 9 वर्षे उलटली होती आणि या वर्षांमध्ये टाटा मोटर्स नवीन उंचीवर पोहोचली होती. तेव्हा तिच Ford Motors दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. यादरम्यान रतन टाटा ((Ratan Tata) यांच्या टाटा ग्रुपने फोर्डच्या Jaguar आणि Land Rover ब्रँड ला खरेदी करण्याची ऑफर दिली. हि डीलबद्दल जेव्हा रतन टाटा आणि बिल फोर्ड यांच्यामध्ये मितीन झाली तेव्हा Ford चे चेयरमन Bill Ford यांचे सूर बदलले होते. त्यांनी या ऑफरबद्दल रतन टाटा यांचे आभार मानले आणि म्हणाले कि तुम्ही Jaguar आणि Land Rover ब्रँडची खरेदी करून आमच्यावर उपकार करत आहात.
रतन टाटा यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी (Ratan Tata 86th Birthday)
- रतन टाटा यांच्यासाठी काम म्हणजेच पूजा आहे. त्यांचे म्हणणे आहे कि काम तेव्हाच चांगले होते जेव्हा तुम्ही त्याचा आदर कराल.
- टाटा चेअरमनचे यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी शांत आणि सौम्य राहतात.
- कंपनीच्या अगदी लहान कर्मचाऱ्यांनासोबत देखील ते प्रेमाने वागतात, त्यांच्या गरजा समजून घेतात आणि शक्यतो त्यांना सर्वतोपरी मदत करतात.
- दिग्गज अब्जाधीश रतन टाटा म्हणतात कि जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळवायचे असेल तर भले हि तुम्ही ते काम एकट्याने सुरु करा पण मोठ्या उंचीवर नेण्यासाठी तुम्हाला लोकांची साथ आवश्यक आहे. एकत्र मिळूनच आपण दूरपर्यंत जाऊ शकता.
- रतन टाटा यांना प्राण्यांची खूप आवड आहे, विशेष करून त्यांना स्ट्रे डॉग्स खूप आवडतात. ते अनेकवेळा एनजीओ आणि अॅनिमल शेल्टर्सना देणगी देतात.
- रतन टाटा आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी आघाडीवर असतात. त्यांची ट्रस्ट अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते. अशा विद्यार्थ्यांना J.N. Tata Endowment, Sir Ratan Tata Scholarship आणि Tata Scholarship द्वारे मदत केली जाते.