Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (Sukanya Samriddhi Yojana) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारने नवीन वर्षा अगोदरच मोठं दिलं आहे. आर्थिक वर्ष 2023-24 चौथ्या तिमाहीसाठी योजनेचे व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आले आहेत. शिवाय 3 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याज 7 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आले आहे ण इतर लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. विशेषत: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF चे गुंतवणूकदारांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.
दुसऱ्यांदा वाढले व्याजदर (Sukanya Samriddhi Yojana)
वित्त मंत्रालयाचे आर्थिक व्यवहार विभागाने 2023-24 च्या चौथ्या तिमाही जानेवारी ते मार्चसाठी छोट्या बचत योजनांमध्ये व्याजदरांचे पुनरावलोकन करून घोषणा केली आहे. छोट्या बचत योजनेमध्ये फक्त सुकन्या समृद्धी योजनेचे (SSY) व्याजदर (sukanya samriddhi yojana interest rate) बदलण्यात आले आहेत. मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या मोदी सरकारच्या या योजनेचा (Sukanya Samriddhi Yojana) व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आले होते. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे.
या योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही
वित्त मंत्रालयाच्या सर्कुलर नुसार बचत ठेवीवर 1 जानेवारी 2024 पासून 31 मार्च 2024 पर्यंत 4 टक्के व्याज मिळेल. 1 वर्षाची अवधी असणाऱ्या ठेवीवर 6.9 टक्के, २ वर्षाच्या ठेवीवर 7 टक्के, 5 वर्षाच्या ठेवीवर 7.5 टक्के व्याज मिळेल. 5 वर्षाच्या रीकरिंग ठेवीवर 6.7 टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट वर 7.7 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूक करण्याऱ्यासाठी 7.5 टक्के व्याज मिले आणि 115 मध्ये मॅच्योर होईल. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम 8.2 टक्के व्याज या तिमाहीमध्ये मिळेल. पोस्ट ऑफिस मंथली इनकम अकाउंट स्कीम वर 7.4 टक्के व्याज मिळेल.
पीपीएफ गुंतवणूकदारांची निराशा
पब्लिक प्रॉविडेंट फंड ( Public Provident Fund) च्या व्याजदारामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आणि यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फक्त 7.1 टक्के व्याज मिळणार आहे. एप्रिल 2020 पासून PPF च्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.