Gautami Patil Song: प्रसिद्ध डांसर गौतमी पाटीलचा बहुप्रतीक्षित मराठी घुंघरू 15 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. मनोहराय फिल्म प्रोडक्शन, बाबा गायकवाड द्वारा दिग्दर्शित आणि श्रीमत ढाकणे या चित्रपटामध्ये लावणी डांसर गौतमी पाटील (Gautami Patil) मुख्य भूमिकेमध्ये आहे. चित्रपटामधील गौतमी पाटीलचे गाणे सध्या खूपच फेमस झाले आहे. या गाण्यातील गौतमी पाटीलच्या अदा आणि स्टेप्स सध्या दर्शकांना भुरळ घालत आहेत.
गौतमी पाटीलचा डांस, व्हिडीओ आणि कार्यक्रम म्हंटले कि दर्शक खूपच उत्सुक होतात. सध्या युट्युबवर रिलीज झालेले चीज मी लई कडक हे गाणे देखील दर्शकान भुरळ घालत आहे. सप्तसूर म्युझिक द्वारा युट्यूबवर रिलीज केलेल्या इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका.. आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांची व्हिडिओ निर्मिती असलेले हे गाणे प्रसिद्ध गायीका वैसाली सामंत यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल आणि संगीत विकी वाघ यांचे आहे.
परफॉरमन्स म्हणावा तसा दिलखेचक नाही (Gautami Patil Song)
गौतमी पाटील आपल्या दिलखेचक परफॉरमन्ससाठी प्रसिद्ध आहे. अनेकवेळा हे तिच्या लाईफ इवेंटमधून पाहायला मिळते. पण चित्रपटामधील या गाण्यामध्ये तिचा म्हणावा तसा परफॉरमन्स झालेला नाही. गाण्यामध्ये तिचा डांस चांगला असला तरी तो इवेंटसाठी दिलखेचक वाटत नाही. असो एखाद्या परफॉरमन्स बद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये कोणा एका कलाकाराला जबाबदार धरता येणार नाही. हि सामुहिक जबाबदारी असते.
हेही वाचा: Panchak Title Song Out: माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चे टायटल साँग रिलीज, भीतीची बाराखडी एकदा पहाच
गौतमीचा हा चित्रपट महाराष्ट्रासहित, पंजाब, केरळ, कर्नाटक, गोवा आणि आंध्रप्रदेश अशा सहा राज्यांमध्ये रिलीज झाला होता. गौतमी पाटीलचे शेवटचे गाणे 15 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान रिलीज झाले होते. मुलाखतीदरम्यान गौतमी पाटीलने म्हंटले होते कि हे गाणं दर्शकांच्या पसंतीस उतरत आहे.
दरम्यान गौतमी पाटीलची तरुणांमध्ये मोठी क्रेज असली तरी अनेकवेळा तिच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून विरोध होतो. खास करून कायदा आणि सुरक्षा व्यवस्था यावरून तिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली जाते. दर्शक देखील तिच्या स्टेजवर पाहण्यासाठी उतावीळ असतात. याची प्रचीती तिच्या लाईव इवेंट मधून येते.