Gold Rate Today Pune: आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली. सोन्या-चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भाव गडगडल्यामुळे ग्राहकांना खरेदी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. डिसेंबरमध्ये सोन्याने उच्चांकी भाव गाठला होता. सोनं 66 हजाराच्या जवळ पोहोचले होते. तर चांदीचा देखील भाव वधारला होता.
सोन्या-चांदीचा भाव घसरला (Gold Rate Today Pune)
3 जानेवारी किंमतीमध्ये घसरण सुरु झाली. आता सलग तीन दिवस सोन्याचा भाव (Gold Rate Today Pune) खाली उतरत आहे. 2 जानेवारी रोजी 2024 रोजी सोनं 270 रुपयांनी वाढले होते, पण 3 आणि 4 जानेवारी रोजी 270 आणि 440 रुपयांनी भाव उतरले. तर 5 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 130 रुपयांनी उतरला.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रामध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,150 रुपये इतका होता. तर 24 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,420 रुपये इतका होता. सोन्याच्या दरामध्ये सकाळच्या सत्रत 20 रुपयांची वाढ झाली. तर चांदीची किंमत घसरली असून. प्रतिकिलो चांदीचा भाव 76,660 रुपये आहे. (Gold Silver Price Today In Marathi)
तुमच्या शहरामध्ये सोन्याचा भाव (Gold Rate Today)
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे आहे.
- मुंबईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,270 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Mumbai)
- पुण्या मध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,270 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Pune)
- नागपूर मध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,270 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Nagpur)
- नाशिक मध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,300 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Nashik)
- ठाणे मध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,270 रुपये इतका आहे. (Gold Rate Today Thane)
- अमरावती मध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 63,270 रुपये इतका आहे. (Gold Rate Amravati)