Hero Electric Scooter Optima CX: Electric Scooters सध्याच्या रेंजमध्ये ओला पासून बजाज Auto पर्यंतचे इलेक्ट्रिक स्कूटर पाहायला मिळतात. ज्या आपल्या डिझाईन, राइडिंग रेंज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पसंत केल्या जातात. आज आपण इलेक्ट्रिक स्कूटर मधील हिरोच्या बेस्ट सेलिंग हीरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स (Hero Electric Scooter Optima CX) बद्दल जाणून घेणार आहोत. जी सध्या मार्केटमध्ये दबदबा टिकवून आहे.
जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एकदा तर या इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन नक्कीच जाणून घ्यायला हवे. इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स (Hero Electric Scooter Optima CX) च्या किंमतीपासून ते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पर्यंत प्रत्येक तपशील खाली दिला आहे.
Hero Electric Scooter Optima CX प्राईस
हीरो ऑप्टिमा सीएक्सला कंपनीने दोन व्हेरिएंटसोबत मार्केटमध्ये लाँच केले आहे. याचे सीएक्स सिंगल बॅटरी व्हेरिएंट आहे ज्याची सुरुवातीची किंमत (Hero Electric Scooter Price) 67,190 आहे आणि दुसरा CX ER अल बॅटरी व्हेरिएंट आहे ज्याची सुरुवातीची किंमत 85,190 रुपये आहे.
Hero Electric Optima CX बॅटरी आणि मोटर
हीरो ऑप्टिमा सीएक्स मध्ये कंपनीने 51.2 V, 30Ah क्षमता असणारी लिथियम आयन बॅटरी पॅक लावली आहे, ज्यासोब्त 550W पॉवरची इलेक्ट्रिक मोटर जोडली गेली आहे जी 1.2 Kw ची पॉवर जनरेट करते. कंपनीचा चार्जिंगबद्दल दावा आहे कि नॉर्मल चार्जरने हि बॅटरी पॅक 4 ते 5 तासामध्ये फुल चार्ज होते.
Hero Electric Optima CX रेंज आणि टॉप स्पीड
हीरो इलेक्ट्रिक दावा करते कि एका फुल चार्ज झाल्यानंतर हिरो ऑप्टिमा सिंगल बॅटरी पॅकवर 82 किमीची रेंज देते तर डुअल बॅटरी पॅक 140 किमीची रेंज देते.
Hero Electric Optima CX सस्पेंशन आणि ब्रेक्स
हीरो ऑप्टिमा सीएक्स च्या सस्पेन्शन बद्दल बोलायचे झाले तर समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स अप सस्पेंशन देण्यात आले आहे आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ऍब्जॉर्बर बसवण्यात आले आहे. ब्रेकिंग सिस्टीममध्ये, कंपनीने दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स बसवले आहेत ज्यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम उपलब्ध आहे.
Hero Electric Optima CX फीचर्स आणि रीवल्स
हीरो इलेक्ट्रिकने या स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, क्रूज कंट्रोल, वॉक असिस्ट फंक्शन, रिवर्स मोड, रिजनरेटिव ब्रेकिंग, रिमोट लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि लो बॅटरी इंडिकेटर सारखे फीचर्स दिले आहेत. हीरो ऑप्टिमा सीएक्स ची स्पर्धा या सेगमेंटमधील बाउंस इनफिनिटी ई1 (Bounce Infinity E1), बीगेस ए2 (BGauss A2) आणि एम्पियर मॅग्नस (Ampere Magnus) सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत होते.