Samsung Galaxy M36 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन एंट्री-लेव्हल मिड-रेंज बजेटमध्ये सादर केला आहे. हा कंपनीच्या M सिरीजचा भाग असून गॅलेक्सी M35 चा उत्तराधिकारी म्हणून बाजारात आला आहे. यात AI फीचर्स आणि टिकाऊपणावर विशेष भर दिला आहे.
हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. यात Corning Gorilla Glass Victus+ स्क्रीन दिली आहे. फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि Exynos 1380 प्रोसेसर आहे. चला तर या स्मार्टफोनच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.
Samsung Galaxy M36 ची किंमत
हा स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च झाला आहे. सॅमसंग गॅलेक्सी M36 चा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 1000 रुपयांच्या बँक सूट नंतर 16,499 रुपयांना उपलब्ध होईल. 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे.
तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. या सर्व व्हेरिएंट्सवर 1000 रुपयांची सवलत मिळत आहे. फोन तुम्ही Serene Green, Velvet Black आणि Orange Haze या रंगांमध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन Amazon वर उपलब्ध असेल आणि 12 जूनपासून खरेदी करता येईल.
वैशिष्ट्ये काय आहेत?
सॅमसंग गॅलेक्सी M36 मध्ये 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह आणि Corning Gorilla Glass Victus+ संरक्षणासह येतो. यात Exynos 1380 प्रोसेसर आहे. स्मार्टफोन 6GB RAM आणि 8GB RAM पर्यायांसह 256GB पर्यंत स्टोरेजसाठी उपलब्ध आहे.
हा फोन Android 15 आधारित One UI 7 वर चालतो. यात Google Gemini, Circle to Search आणि AI Select सारखे फीचर्स आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा स्मार्टफोन 6 वर्षे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स प्राप्त करेल. फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
फ्रंटमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षा यंत्रणेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि Samsung Knox Vault दिला आहे.
हे पण वाचा :- Oppo Reno 14 Pro 5G आणि Reno 14 5G भारतात लाँच होणार, मिळेल 50MPचा फ्रंट कॅमेरा