Gold Rate Today 01 July 2025 : सोन्याच्या भावात सलग घसरण सुरू आहे. आज महिन्याच्या पहिल्या दिवशी मंगळवार १ जुलैला सोन्याच्या भावात विशेष फरक दिसत नाही. सोन्याचा भाव कालच्या दरावरच व्यवहार करत आहे. बुलियन मार्केटमध्ये १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,५०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ८९,३०० रुपयांवर व्यवहारात आहे. देशात १ किलो चांदीचा दर १,०७,७०० रुपये प्रति किलो आहे. येथे जाणून घ्या सोनं-चांदीचे भाव.
१ जुलै २०२५ रोजी सोन्याचा भाव
आज मंगळवार १ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोनं ८९,४४० रुपये आणि २४ कॅरेट सोनं ९७,५६० रुपये प्रति १० ग्राम आहे. मुंबईतही २२ कॅरेट सोनं ८९,२९० रुपये आणि २४ कॅरेट सोनं ९७,४१० रुपये प्रति १० ग्रामवर व्यवहार चालू आहे. पटणा, लखनौ, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्येही सोन्याचा भाव याच दराजवळ स्थिर आहे.
शहराचे नाव | २२ कॅरेट सोन्याचा भाव | २४ कॅरेट सोन्याचा भाव |
दिल्ली | 89,440 | 97,560 |
चेन्नई | 89,290 | 97,410 |
मुंबई | 89,290 | 97,410 |
कोलकाता | 89,290 | 97,410 |
जयपुर | 89,440 | 97,560 |
नोएडा | 89,440 | 97,560 |
गाजियाबाद | 89,440 | 97,560 |
लखनऊ | 89,440 | 97,560 |
बंगलुरु | 89,290 | 97,410 |
पटना | 89,290 | 97,410 |
चांदीची किंमत – मंगळवार १ जुलै २०२५
चांदीचा भाव आज मंगळवार १ जुलै २०२५ रोजी १,०७,७०० रुपये प्रति किलोवर व्यवहारात आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या भावातही गेल्या १० दिवसांत मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
देशात सोन्याच्या किमती कशा ठरतात? Gold Rate
भारतामध्ये सोन्याच्या किमती दररोज बदलतात कारण त्या अनेक घटकांवर अवलंबून असतात जसे की जागतिक सोन्याचा दर काय आहे, डॉलर आणि रुपयातील बदल किती झाला आहे, सरकार किती कर आकारत आहे.
हे पण वाचा :- Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी येईल, एकत्र 3000 रुपये मिळण्याबाबत काय चर्चा? सगळी माहिती जाणून घ्या