Shri Swami Samarth Prakat Din 2024 Date श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, श्री स्वामी समर्थ फोटो, स्वामी समर्थ स्टेटस मराठी, स्वामी समर्थ फोटो वॉलपेपर, स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ स्टेटस, Swami Samarth Photo स्वामी समर्थ फोटो श्री स्वामी समर्थ फोटो स्वामी समर्थ तारक मंत्र स्वामी समर्थ फोटो
Swami Samarth Prakat Din 2024 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे‘ अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या Shri Swami Samarth Prakat Din 2024 श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये बुधवार 10 एप्रिल रोजी आहे
श्री स्वामी समर्थ
उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले.
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.
इ.स. 1856 च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके 1778, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. 06/04/1856 हा होता. दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 10 एप्रिल 2024, बुधवार रोजी प्रकट दिन आहे. Shri Swami Samarth Prakat Din 2024
स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत Shri Swami Samarth Prakat Din 2024
स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक आतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या आनुभावावरून आपल्याला समजेलच कि स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आशी. Shri Swami Samarth Prakat Din 2024
शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावचा गाव होता. त्याठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याश्या अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या आश्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती, तर तो विजयसिंग खुप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपती ला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतः वरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंग ला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया. आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या हि दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले कि रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले ”बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं” बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना कि काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची हि सूचना होती. आणि ज्याठिकाणी गणेश मूर्ती होती त्याठिकाणी धरणी दुभंगून एक ८ वर्षाची आतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकढून हरला आणि बालरूप स्वामिनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले. Shri Swami Samarth Prakat Din 2024
थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला. आता शंका हि उपस्थित होईल कि हि गोष्ट कशी काय कळली. पण यागोष्टीचा उलगडा आस झाला. कोकणातील हरिभाऊ (स्वमिसुत) हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापुरती साठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यला होते. आणि एक दिवस स्वामिनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले कि आजपासून तू माझा सुत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरीभाऊना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्ती साठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगता आहेत हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले कि “रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू.” आणि ज्यावेळी हरीभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसर तिसर कोणी नाही तर तो स्वमिसुतांचाच पूर्व अवतार होता.आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. आणि या गोष्टीला स्वतः स्वामिनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे. Shri Swami Samarth Prakat Din
स्वामी प्रकटदिनाचा उत्सव (Shri Swami Samarth Prakat Din 2024) स्वमिसुत महाराजांनी सुरु केला आहे. ज्यावेळी स्वमिसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मधे करत होते तेव्हा भुजंगा सारख्या भक्तांनी स्वामिना प्रश्न विचारला स्वमिसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उततर आसे होते”माझा बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.” नाना रेखी नावाचे अहमदनगर चे स्वामीभक्त होते ते स्वमिसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोट ला आले होते तर ते पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामिनी त्यांना आज्ञा केली कि माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरु केल. आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता, तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरु होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामिनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वैगेरे वाहून सर्व दैवतानि त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयाती पर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच आर्थ स्वामिनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्ष रित्या स्वामीसुतानी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटन्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही हि स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगर च्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्द्लीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वताचे खरे नाव, ओळख लपवून चंचलभारती, दिगंबर बुवा आशा नावाने सुद्धा कार्यरत होते. Shri Swami Samarth Prakat Din 2024