Akshaya Tritiya Puja Muhurat : अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय खास मानला जातो. हिंदू धर्माच्या श्रद्धानुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करणं फार शुभ असतं. या दिवशी समृद्धी आणि सौभाग्य यांचा प्रतीक मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या पर्वाची खरी तारीख आणि पूजा मुहूर्त काय आहे, ते तुम्ही पटकन तपासू शकता.
अक्षय तृतीया 2025 ची तारीख आणि पूजा मुहूर्त
अक्षय तृतीयेचा पूजा मुहूर्त 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5:31 वाजल्यापासून सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:12 वाजेपर्यंत पूजा चालेल.
अक्षय तृतीयेच्या दिवशी हे वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं
अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पितळ आणि तांब्याचे सामान खरेदी करू शकता. याशिवाय सोनं-चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करणं फार शुभ असतं. घर, जमीन किंवा नवीन गाडी खरेदी करणंही या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र, या दिवशी अॅल्युमिनियम किंवा स्टीलचे सामान खरेदी करणं टाळावं आणि कर्ज घेणंही योग्य नाही.
‘अक्षय तृतीया’ या शब्दाचा अर्थ
अक्षय तृतीयाचा अर्थही फार खास आहे. ‘अक्षय’ म्हणजे शाश्वत, जो कधीच संपत नाही, तर ‘तृतीया‘ म्हणजे शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस. हिंदू धर्माच्या श्रद्धेनुसार, या दिवशी शुभ कार्य केल्यास आयुष्यभर समृद्धी प्राप्त होते. अनेक लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा नोकरीला लागतात.
याशिवाय गृहप्रवेश, शेतीशी संबंधित नवीन कामं सुरू करतात आणि अनेक शुभ कार्य करतात. या दिवशी लोक देवतांच्या पूजा करतात, मंदिरे सजवतात आणि विशेष विधी करतात. या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व असते; काही लोक गरजू आणि गरिबांना अन्न देण्यासाठी अन्नवाटपही करतात.
हे पण वाचा :- 50+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी Happy Birthday Wishes