Amitabh Bachchan at Ram Mandir: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन 9 फेब्रुवारी रोजी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा अयोध्याला पोहोचले. वास्तविक एका ज्वेलरी स्टोअरच्या उद्घाटनासाठी बिग बी अयोध्याला गेले होते. मात्र त्यांना रामलल्लाचे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी वेळ काढून राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. (Amitabh Bachchan at Ram Mandir) यादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
अमिताभ यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन
रामलल्लाच्या दर्शनानंतर अमिताभ यांनी अयोध्या मंडळचे कमिश्नर गौरव दयाल यांच्या घरी देखील वेळ घालवला. यादरम्यान अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यांनी फोटो काढले. यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते ज्वेलरी स्टोअरच्या उद्घाटनाला गेले. त्यांनी स्वतःच्या हाताने स्टोअरचे उद्घाटन केले. (Amitabh Bachchan at Ram Mandir)
जय श्री राम चा जयघोष
तिथे उपस्थित असलेल्या लोकानी संबोधित करताना अमिताभ यांनी सर्वप्रथम ‘जय श्री राम’चा जयघोष केला. आपल्या जीवनामधील अनेक किस्से त्यांनी यादरम्यान शेयर केले. शेवटी पुन्हा एकदा रामचा जयघोष करून उद्घाटनाची सांगता झाली. फ्री झाल्यानंतर अमिताभ यांनी मिडियासोबत संवाद साधला. त्यांनी म्हंटले कि 22 जानेवारी रोजी आम्ही आलो होतो. अनेक लोक म्हणतात जर तुमचे येणे-जाणे राहिले नाही तर तुमचे नाते कसे राहणार.
सुपरस्टार अमिताभ बच्चन ने अयोध्या में राम मंदिर में पूजा की। pic.twitter.com/cL7cEuQlfT
— ANI_HindiNews (@AHindinews) February 9, 2024
“बाबूजींनी आम्हाला एकदा एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. आमचा जन्म अलाहाबादमध्ये झाला. त्यानंतर आम्ही दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत राहिलो, त्यामुळे आम्ही कुठे राहायचे यावर चर्चा झाली. तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात, म्हणून ते म्हणायचे कि, हाथी घूमे गांव-गांव जेके हाथी ओके नाव… हे खरे आहे कि आम्ही दिल्ली, कोलकाता, मुंबईमध्ये राहिलो, पण जिथे देखील राहिलो तिथे म्हंटले गेले कि, छोरा गंगा किनारे वाला.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन जवळ सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्यावर सध्या ते काम करत आहेत. गेल्या वर्षी ‘केबीसी’ शो संपला आहे. शिवाय अमिताभ बच्चन Kalki 2898 AD चित्रपटामध्ये देखील दिसणार आहेत. या चित्रपटामधील त्यांचा लुकदेखील रिलीज झाला होता. जो पाहिल्यानंतर चाहते शॉक्ड झाले होते. गणपत आणि ऊंचाई चित्रपटामध्ये ते शेवटचे पाहायला मिळाले होते. अमिताभ एक कोर्ट रूम ड्रामा ‘सेक्शन 84’ मध्ये देखील पाहायला मिळू शकतात.