चेहरा झाकून अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी पोहचला दिग्गज अभिनेता, प्रभू श्री रामाने ओळखले अन्…

Anupam Kher at Ram Mandir: अभिनेता अनुपम खेर राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी इवेंट संबंधी अनेक झलक सोशल मिडियावर शेयर केल्या आहेत. आता लेटेस्ट पोस्टमध्ये त्यांनी अयोध्या राम मंदिरमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा नजारा दाखवला आहे. ते चेहरा लपवून मंदिरामध्ये गेले होते. (Anupam Kher at Ram Mandir) तिथे लोकांची भक्ती पाहून अनुपम खेर खूपच खुश आहेत. त्यांनी सांगितले कि एका व्यक्तीने त्यांच्या कानामध्ये काय सांगितले.

चेहरा लपवून पोहचले अनुपम खेर – Anupam Kher at Ram Mandir

अनुपम खेर त्या खास लोकांपैकी आहेत ज्यांना प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात स्पेशल गेस्ट बनण्याची संधी मिळाली होती. आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशीचा नजारा दाखवला आहे. अनुपम खेरने एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्याचबरोबर कृपया शेवटपर्यंत पहा असे देखील लिहिले आहे. काल मी आमंत्रित अतिथी बनून राम मंदिरात गेलो होतो.

पण आज सगळ्यांसोबत शांतपणे मंदिरात जावंसं वाटलं. भक्तीचा असा समुद्र पाहून मन आनंदाने भरून आले. रामजींना पाहण्यासाठी लोकांचा उत्साह आणि भक्ती पाहण्यासारखी होती. (Anupam Kher at Ram Mandir) जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा एका भक्ताने माझ्या कानामध्ये हळूच म्हंटले कि, भैयाजी चेहरा झाकून काही होणार नाही, राम लल्लाने ओळखले. #जयश्रिराम

लोकांनी केली प्रशंसा

अनुपम खेर यांच्या पोस्टवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका फॉलोअर हि हृदयस्पर्शी भक्ती आहे असे लिहिले आहे. मंदिराच्या आसपासच्या उर्जेला तोड नाही. हा खूपच सुंदर अनुभव आहे. जय श्रीराम. तर एकाने खूपच भावूक क्षण असे लिहिले आहे. तर एका युजरने लिहिले आहे कि, काका गर्दीत घसले, तुमचा उत्साह पाहून मजा आली. देवासमोर सर्व भक्त सारखेच असतात. कोणीही सामान्य किंवा खास नसतो.

प्राण प्रतिष्ठेला डोळ्यामध्ये अश्रू

anupam kher
Anupam Kher

आणखी एका पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीची क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, मी माझ्या आयुष्यात खूप भावनिक दृश्ये पाहिली आहेत. अनेक प्रसंगी माझ्या डोळ्यात अश्रू आले आहेत. पण आज जेव्हा #IndianAirforce च्या हेलिकॉप्टरने राम मंदिरावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला तेव्हा माझ्या अश्रूंचा बांध फुटला. कदाचित गेल्या काही वर्षांच्या रामजीबद्दलच्या भावना पूर्णपणे समोर आल्या असतील. व्हिडिओ शूट करताना मी रडत होतो आणि हसत होतो! दोन्ही भाव पूर्णपणे जागरूक होते. कदाचित ही रामजींची जादू असावी! जय श्री राम! फ्लॉवर शॉवर व्हिडिओ पहा.

हेही वाचा: सचिन तेंडूलकर पासून विराट कोहली पर्यंत राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी पोहोचले ‘हे’ क्रिकेटर्स, तर धोनी आणि रोहित…