सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल, वाचा लिंबू पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे

लिंबू पाणी पिण्याचे फायदे: जुन्या काळापासून आरोग्यासाठी लिंबू पाणी पिले जाते. कोरोनाच्या काळामध्ये याचा वापर खूप वाढला होता. परनामी जे लोक चहा, कॉफी पीत होते त्यांनी देखील लिंबू पाणी पिण्यास सुरु केले. आयुर्वेदामध्ये अॅलोपॅथीने देखील लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे मानले आहेत. एका अभ्यासानुसार लिंबू पाणी पिल्याने वजन देखील कमी होते असे समोर आले आहे. त्याह्बारोब्र अनेक प्रकारच्या संसर्गाचा देखील धोका कमी होतो. चला तर जाणून घेऊया लिंबू पाणी पिण्याचे फायदे. (Benefitis of Driking Lemon Water)

लिंबू पाणी पिण्याचे फायदे

लिंबू पाणी पिण्याचे फायदे

रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे फायदे: सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने याचा जास्तीत जास्त लाभ मिळतो. लिंबू (Lemon) पाणी यकृत उत्तेजित करून पित्त प्रवास सुरळीत करते आणि एंझायम फंक्शन वाढते. लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होण्यास देखील मदत मिळते.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते: लिंबू पाणी पिणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. लिंबू सारखी सिट्रस फळे विटामिन सी चा खूप चांगला स्रोत मानली जातात. हि फळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. विटामिन सी हृदयरोग आणि स्ट्रोक सह रक्तदाबाचा धोका कमी करतात. एका लिंबाच्या रसामधून सुमारे 18.6 मिग्रॅ इतके विटामिन सी मिळते.

त्वचा तजेलदार बनवते: लिंबामध्ये अढळणारे विटामिन सी त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास आणि उन्हामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. जर त्वचेमधील आर्द्रता कमी झाली तर ती कोरडी पडे आणि सुरकुत्या येऊ लागतात. लिंबूवर्गीय पेय त्वचेमध्ये सुरकुत्या कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

वजन कमी करण्यास प्रभावी: लिंबामध्ये अढळणारे पॉलीफेनॉल अँटिऑक्सिडंट्स लठ्ठपणा ठरणारे घटक कमी करण्यास मदत करतात. एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे कि लिंबामध्ये अढळणारे अँटिऑक्सिडंट्स संयुगे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिन प्रतिरोध सुधारण्यास देखील उपयुक्त आहेत.

हेही वाचा: जेवणानंतर ताक पिण्याचे फायदे, छान-गोडसर चवीचं ताक प्या आणि तब्येतीच्या तक्रारी टाळा