सलमान पासून जुही चावला पर्यंत, शेतीमध्ये रमले बॉलीवूडचे ‘हे’ स्टार्स, पहा फोटोज

Bollywood Celebs Farming: बॉलीवूड सेलिब्रिटी चित्रपटाच्या व्यतिरिक्त काही ना काही करत असतात, जसे चित्रपट करण्याव्यतिरिक्त काही सेलिब्रिटी यशस्वी उद्योगपती देखील आहेत. त्यातील काही असे देखील आहेत कि, जे त्यांच्या फिटनेस बाबतीत खूप सतर्क असतात. त्यामुळे खाण्यापिण्यावर जास्त लक्ष देत असतात. जसे कि आपण सगळे जाणतो कि आजकाल जास्तीत जास्त फळे असो अथवा भाजीपाला असो अथवा खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू असो सर्वांमध्ये भेसळ पाहायला मिळते. सेंद्रिय गोष्टी क्वचितच मिळतात. म्हणूनच हे सिनेस्टार सेंद्रिय शेतीकडे (Bollywood Celebs Farming) वळले आहेत आणि त्यांनी स्वतः च्या हिरव्या आरोग्यदायी भाज्या पिकवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यापैकी काही जणांनी अनेक एकर जमीन घेऊन शेती सुरु केली आहे. जेणेकरून त्यांना चांगल्या ताज्या आणि शुद्ध भाज्या खायला मिळतील. चला तर पाहूयात बॉलीवूडचे कोणते स्टार्स शेती करतात.

बॉलीवूड स्टार्स करतात शेती – Bollywood Celebs Farming

धर्मेंद्र : हि-मैन धर्मेंद्र त्यांच्या फार्म हाउसवर कायम वेळ घालवत असतात, ज्याचे व्हिडीओ ते त्यांच्या चाहत्यांच्या सोबत शेअर करत असतात. त्यांच्या फार्महाऊस मध्ये धर्मेंद्रजी अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे उगवतात. त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये गाय देखील पाळली आहे. धर्मेंद्रजी नी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये त्यांचा वेळ त्यांच्या फार्महाउस वर शेती करण्यात घालवला आहे.

शिल्पा शेट्टी कुंद्रा : शिल्पा शेट्टी कुंद्रा ला जर योगा क्वीन म्हणाल तर ते चुकीचे ठरणार नाही कारणकी ती तिच्या फिटनेस वर खूप लक्ष देते म्हणून तिला हे नाव योग्य आहे. अनेक वेळा सोशल मिडीयावर ती तिच्या डाएट चे देखील व्हिडीओ टाकत असते. त्याव्यतिरिक्त, ती तिच्या सेंद्रिय किचन गार्डन बद्दल देखील खूप चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या बागेतून कमरखा तोडतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या सकस आहाराची काळजी घेत शिल्पा स्वतः च्या घरात शेतीही करते.

सलमान खान : भाईजान सलमान खान अनेकवेळा त्याच्या पनवेल मधील फार्महाऊसवर (Bollywood Celebs Farming) असतो, परंतु अनेकवेळा तो कधी घोडेस्वारीचे तर कधी चालतानाचे फोटो पोस्ट करत असतो. पण आता त्याला शेतीचे देखील वेड लागले आहे. ज्याचे फोटो आपल्याला लॉकडाऊन मध्ये पाहायला मिळत होते.

आर माधवन : आर माधवन ने अलीकडेच एक मोकळी जागा खरेदी केली आहे, जिला शेतीच्या नवीन आणि आधुनिक पद्धतीने सुपीक बनवले. असे करण्यास त्याला ५ वर्ष लागले. माधवन ने त्याजागेला त्याच्या मेहनतीने आणि नवीन तंत्रज्ञानाने हिरव्यागार नारळाच्या शेतीत रुपांतरीत आहे.

जैकी श्रॉफ : जैकी श्रॉफ लोकांना कायम सेंद्रिय शेती आणि झाडे लावण्याबाबत जागरुकता करत असतात. लॉकडाऊन च्या वेळी त्यांनी हेच केले होते. जग्गू दादा ने मुंबई आणि पुण्याच्या जवळ ४४ हजार वर्ग फुट मध्ये एक फार्महाऊस बनवला आहे, ज्यामध्ये तो शेती (Bollywood Celebs Farming) करतो.

दिया मिर्जा : दिया मिर्जा ने देखील तिच्या घरामध्ये अनेक फळांच्या आणि भाज्यांची रोपे लावली आहेत. तिच्या या लहानशा बागेमधील फोटो ती कायम तिच्या चाहत्यांच्या सोबत शेअर करत असते. अलीकडेच दिया मिर्जा एका मुलाची आई बनली आहे.

प्रीती झिंटा : क्युट डिंपल गर्ल प्रीती झिंटा ने सांगितले कि तिने तिच्या आई कडून शेती शिकली आहे आणि ती तिच्या शेतात शिमला मिरची टोमेटो, केळी, स्ट्रॉबेरी, संत्री, पीच आणि पेरू पिकवते आणि प्रीती आता स्वतः ला अधिकृत शेतकरी म्हणवू लागली आहे.

जुही चावला : अभिनेत्री जुही चावला चित्रपटांच्या पासून लांब अलीकडे तिचा वेळ शेतीमध्ये (Bollywood Celebs Farming) व्यतीत करत आहे. ती तिच्या फार्म हाउस मध्ये लावलेल्या आंब्याच्या झाडांची देखभालीकडे जास्त वेळ लक्ष देत आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केले होते. या फोटोंमध्ये देखील तुम्ही पाहू शकता कि ती हातामध्ये शेतीशी संबंधित अवजारे घेऊन बटाटे काढण्याची तयारी करत आहे.

प्रकाश राज : अभिनेता प्रकाश राज ने काही दिवसांपूर्वी झाडे लावण्यासाठी काही एकर जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर काही वर्षांपूर्वी प्रकाश राज भाज्या आणि धान्य उगवताना (Bollywood Celebs Farming) दिसत आहेत. त्याने सांगितले होते कि, “मी शेती केल्या नंतर मी आणखी जास्त सुंदर, संयमशील आणि शांती झालो आहे.

हेही वाचा: कपाळी टिळा, गळ्यामध्ये फुलांची माळ… तमन्ना भाटियाने सहकुटुंब घेतले कामाख्या देवीचे दर्शन, पहा फोटोज