Gautami Patil Sundara Video Song : गौतमी पाटीलच्या नखर्यातून आणि जबरदस्त नृत्यातून ‘सुंदरा’ गाणं प्रदर्शित झाले आहे. या रोमँटिक गाण्यात गौतमीसोबत अभिनेता निक शिंदेही दिसतोय. अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता होती आणि आता ते प्रेक्षकांसमोर आले आहे.
गाण्यात गौतमी आणि निकचा खास अंदाज पाहायला मिळतो. गौतमीची खट्याळ अदा प्रेक्षकांना भुरळ घालते, तर सुंदर ठिकाणी शूट केलेले दृश्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. निकचा नृत्यसुद्धा आकर्षक आहे.
गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. वैभव देशमुख यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार केलेल्या या गाण्याचे संगीत रोहित नागभिडे यांनी दिले आहे, ज्यांनी ‘टिंग्या’, ‘लालबागची राणी’, ‘लूज कंट्रोल’, ‘ख्वाडा’, ‘टीडीएम’, ‘लगन’ यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले आहे.

SUNDARA | सुंदरा | Gautami Patil | Nick Shinde Video Song
Video Song Link :- Youtube
गौतमी पाटीलने सांगितले की, “कृष्ण मुरारी या गाण्याच्या यशानंतर माझं ‘सुंदरा’ गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे. प्रेक्षकांनी कृष्ण मुरारीप्रमाणेच ‘सुंदरा’लाही प्रेम द्यावं आणि या गाण्यावर सुंदर रील व्हिडीओ बनवावेत.”
गायिका सोनाली सोनावणे म्हणाल्या, “गाण्याचं नाव ‘सुंदरा’ असल्यामुळेच त्याची सुंदरता समजेल. मला गाणं गाताना खूप आनंद आला आणि मला खात्री आहे की तुम्हालाही ते आवडेल. रोहित राऊत आणि मी हे गाणं गायले आहे. संगीत रोहित नागभिडे यांनी दिलं असून, शब्द वैभव देशमुख यांचे आहेत.”
हे पण वाचा :- ‘पंचायत सीझन 4’ पासून ‘स्क्विड गेम 3’ पर्यंत, या आठवड्यात OTT वर मजा फुल्ल, येथे पहा संपूर्ण यादी