Gold Rate Today 03 July 2025 : आजचा सोन्याचा दर: सोन्याच्या भावात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत गुरुवार, ३ जुलै रोजी सोन्याचा भाव ८०० रुपये इतका वाढला आहे. बुलियन मार्केटमध्ये १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,४०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,२०० रुपयांच्या वर व्यवहार होत आहे. देशात एका किलो चांदीचा दर १,११,००० रुपये प्रति किलो आहे. चांदीचे भाव आज ३०० रुपये महाग झाले आहेत. येथे जाणून घ्या सोनं-चांदीचे भाव.
३ जुलै २०२५ रोजी सोन्याचा भाव
आज गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोनं ९१,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोनं ९९,४८० रुपये प्रति १० ग्राम आहे. मुंबईमध्येही २२ कॅरेट सोनं ९०,०५० रुपये आणि २४ कॅरेट सोनं ९९,३३० रुपये प्रति १० ग्राम व्यवहारात आहे. पटना, लखनऊ, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये सोन्याचा भाव या दराजवळ स्थिर आहे.
शहराचे नाव | २२ कॅरेट सोन्याचा भाव | २४ कॅरेट सोन्याचा भाव |
दिल्ली | 91,200 | 99,480 |
चेन्नई | 91,050 | 99,330 |
मुंबई | 91,050 | 99,330 |
कोलकाता | 91,050 | 99,330 |
जयपुर | 91,200 | 99,480 |
नोएडा | 91,200 | 99,480 |
गाजियाबाद | 91,200 | 99,480 |
लखनऊ | 91,200 | 99,480 |
बंगलुरु | 91,050 | 99,330 |
पटना | 91,050 | 99,330 |
चांदीचा भाव
चांदीचा भाव आज गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी १,११,००० रुपये प्रति किलो आहे. चांदीच्या भावात कालच्या तुलनेत ३०० रुपयांची वाढ झाली आहे.
देशात सोन्याची किंमत कशी ठरते? Gold Rate
भारतामध्ये सोन्याच्या किमती रोज बदलत असतात कारण त्या अनेक घटकांवर अवलंबून असतात, जसे की जागतिक सोन्याचा दर काय आहे, डॉलर आणि रुपयाच्या विनिमय दरात किती फरक आहे, आणि सरकार किती कर आकारते.
हे पण वाचा :- Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी येईल, एकत्र 3000 रुपये मिळण्याबाबत काय चर्चा? सगळी माहिती जाणून घ्या