GST Collection April 2025: भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2025 मध्ये एकूण GST कलेक्शन 2.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील महिन्याच्या तुलनेत GST कलेक्शनात 20.7% वाढ नोंदली गेली आहे. तर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याशी तुलना केल्यास, यावेळी 12.6% अधिक कर जमा झाला आहे.
एप्रिल 2024 मध्ये GST Collection किती होते?
एप्रिल 2024 मध्ये भारत सरकारने 2.10 लाख कोटी रुपयांचे GST कलेक्शन केले होते. GST लागू झाल्यानंतर (1 जुलै 2017) हे दुसरे सर्वात मोठे कलेक्शन होते. मार्च 2025 मध्ये कलेक्शन 1.96 लाख कोटी रुपये होते, मात्र एप्रिल 2025 मध्ये पुन्हा जोरदार वाढ झाली आणि कलेक्शन 2.37 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.
सरकारी आकडेवारीनुसार, देशांतर्गत व्यवहारांमधून (म्हणजे देशाच्या आतल्या खरेदी-विक्रीमधून) GST महसूल 10.7% वाढून सुमारे 1.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर आयात केलेल्या वस्तूंमधून होणाऱ्या महसुलात 20.8% वाढ झाली असून तो 46,913 कोटी रुपये झाला आहे.
याशिवाय GST परतफेडीची प्रक्रिया देखील जलद झाली असून एप्रिलमध्ये एकूण 27,341 कोटी रुपयांचे परतफेडीचे पैसे देण्यात आले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 48.3% जास्त आहे.
मार्च 2025 मधील GST कलेक्शन
मागील महिना म्हणजेच मार्च 2025 मध्ये GST कलेक्शनात फेब्रुवारीच्या तुलनेत 10% वाढ झाली होती. या वाढीसह मार्च महिन्याचे कलेक्शन मागील 11 महिन्यांतील सर्वाधिक होते. सरकारी आकडेवारीनुसार, मार्चमध्ये परतफेडीनंतर सरकारकडे आलेल्या निव्वळ कलेक्शनातही 9% वाढ झाली आहे. निव्वळ कलेक्शन एकूण 1.76 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ देशात कर वसुली सातत्याने सुधारत आहे आणि व्यापाऱ्यांकडून कर भरण्यात गती आली आहे. हे आर्थिक क्रियाकलाप मजबूत होत असल्याचे संकेत मानले जात आहे.
हे पण वाचा :- LPG Price Down मे महिन्याची शुभ सुरूवात, सलग दुसऱ्या महिन्याला गॅसच्या दरांत घट, तपासा ताज्या दरांची माहिती