Hero Surge S32: ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्या वेगवेगळे प्रयोग करतात. जेणेकरून लोकांचे जीवन सुकर करता येईल. त्याचबरोबर कमी किंमतीमध्ये त्यांना चांगली वाहने देखील देता येतील. आता यामध्ये हिरोचे देखील नाव जोडले गेले आहे. हिरोने आपले असे एक वाहन सादर केले आहे जे थ्री-व्हीलर आणि टू-व्हीलर म्हणून काम करते. सहज शब्दांमध्ये सांगायचे झाले तर हि थ्री-व्हीलर, टू-व्हीलरमध्ये कन्वर्ट करता येते. इतकेच नाही तर एक हि एक कार्गो थ्री-व्हीलर आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही या भव्य वाहनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हिरोने या अनोख्या व्हेहिकलला सर्ज (SURGE) नाव दिले आहे. तर या व्हेहिकलची हि सर्ज Hero Surge S32 सिरीज आहे. सर्ज S32 जगातील पहिले क्लास-शिफ्टिंग व्हेहिकल आहे. जे युजर्सना कमाईसोबत आपली जीवनशैली उत्तम बनवण्यासाठी मदत करते. गोयंका यांनी जो व्हिडीओ शेयर केला आहे तो पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता कि हि किती जबरदस्त टेक्नोलॉजी व्हेहिकल आहे. सध्या याच्या किंमतीबद्दल आणि लॉन्चिंग डेट बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वास्तविक या कार्गो थ्री-व्हीलर मध्येच टू-व्हीलर किंवा एक स्कूटर लपली आहे. आधी हि एक थ्री-व्हीलर आहे आणि ज्याच्या फ्रंट फ्रंट सीटवर दोन व्यक्तींना बसण्यासाठी जागा आहे, पण जेव्हा यामधून स्कूटर बाहेर येते तेव्हा यामध्ये सीटिंग कॅपेसिटी स्कूटरच्या सीट वर शिफ्ट होते. थ्री-व्हीलर वरून टू-व्हीलर बनण्यासाठी या व्हेहिकलला फक्त 3 मिनिटाचा वेळ लागतो. त्याचबोरबर एडॉप्टिव कंट्रोल आणि सेफ ऑपरेशंसचे बटन देखील दिले आहे. याला कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये कन्वर्ट केले जाऊ शकते. कंपनी ने या सिरीजचे एकूण 4 व्हेरियंट लॉन्च करण्याची योजना आखली आहे.
Hero Surge S32 टेक्निकल स्पेसिफिकेशंस
Hero Surge S32 च्या टेक्निकल स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे झाले तर या थ्री-व्हीलर आणि टू-व्हीलर मध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स मिळतात. जेव्हा हि थ्री-व्हीलर असते तेव्हा यामध्ये 10Kw ची पॉवर मिळते. यासाठी याला 11Kwh ची बॅटरी जोडण्यात आली आहे. तर याची मॅक्सिमम स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे. तर हि 500 किलो वजनाचा लोड सहज घेऊ शकते. आता टू-व्हीलर पॅरामीटर्स बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 3Kw ची पॉवर मिळते. यासठी याला 3.5 Kwh ची बॅटरी जोडण्यात आली आहे. तर याची मॅक्सिमम स्पीड 60 किलोमीटर प्रति तास आहे.
हेही वाचा: हिरो करिज्मा पेक्षादेखील स्वस्त इलेक्ट्रिक कार, फ्री मध्ये करा बुकिंग, टाटा नॅनो विसरून जाल