Kaathal OTT Release: ममूटी आणि ज्योतिका स्टारर मल्याळम चित्रपट ‘काथल- द कोर’ आता OTT प्लॅटफॉर्मवर आला आहे. या चित्रपटाचे खूपच झाले होते आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
Kaathal OTT Release
‘काथल- द कोर’ प्राईम व्हिडीओवर मल्याळम शिवाय तमिळ, तेलगु, कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये शुक्रवारी रिलीज (Kaathal OTT Release) झाला आहे. जिओ बेबीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती स्वत: ममूटी यांनी केली आहे. काथल गेल्या 23 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता आणि याला क्रिटिक्सचा सपोर्ट देखील मिळाला होता.
काय आहे काथलची स्टोरी?
ममूटी रिटायर्ड बँक मॅनेजर मॅथ्यू देवासी यांची भूमिका साकारत आहे, तर ज्योतिका त्यांची पत्नी उमाना मॅथ्यूची भूमिका साकारत आहे. मॅथ्यू पंचायत निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहतो. त्याच्या या निर्णयामुळे प्रत्येकजण चकित होतो. या स्टोरीमध्ये तेव्हा ट्वीस्ट येते जेव्हा उमाना एक धक्कादायक पाऊल उचलते. स्टोरी जसे जसे पुढे जाते तसे त्यांच्या वैवाहिक आयुष्यामधील पडदा उघडण्यास सुरुवात होते.
ममूटी आणि ज्योतिकाचे फिल्मी करियर
अभिनेता दुलकर सलमानचे वडील ममूटी मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता आहे. पाच दशकाच्या करियरमध्ये त्यांनी जवळ जवळ 400 चित्रपटांमध्ये कम केले आहे. ममूटीने 1971 च्या अनुभवंगल पालीचाकल (Anubhavangal Paalichakal) या मल्याळम चित्रपटामधून अभिनय करियरची सुरुवात केली होती. नुकतेच ममूटीच्या भ्रमयुगम चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला गेला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.
तर ज्योतिका सरवननने डोली सजाके रखना या हिंदी चित्रपटामधून अभिनय करियरची सुरुवात केली होती. यानंतर ज्योतिकाने तमिळ आणि तेलगु इंडस्ट्रीमध्ये काम केले. तिने प्रसिद्ध अभिनेता सूर्या शिवकुमार सोबत लग्न केले आहे. ज्योतिका फिल्म निर्मिती देखील करते. काथल चित्रपटामधून ज्योतिका 12 वर्षानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये परतली आहे.
हेही वाचा: ओटीटी वर लवकरच पाहायला मिळणार रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट, या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज