Bhogi 2024 : संक्रांतीला भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी का खाल्ली जाते? जाणून घ्या शास्त्रीय कारण

Bhogi 2024: मकर संक्रांतीच्या अगोदर भोगी साजरी केली जाते. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ असं वाक्य तुम्ही नेहमी ऐकले असेल. आपले आजी-आजोबा नेहमी हे वाक्य बोलत असत. हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. या काळामध्ये शेतीला बहर आलेला असतो. यादरम्यान शेतकरी भोगीची भाजी (Bhogi 2024) आणि तीळ घालून केलेल्या भाकऱ्या खातात.

सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी (Bhogi 2024) केली जाते. या भाजीमध्ये हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर या सर्व भाज्या मिसळल्या जातात. या भाजीची फोडणी देताना तीळ टाकले जाते.

भोगीला हि भाजी सगळीकडे केली जाते. या दिवशी या भाजीला विशेष मन असतो. पण आरोग्याच्या दृष्टीने या भाजीचे खूप महत्व आहे. थंडीच्या दिवसांमध्ये हि भाजी खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते. चला तर मग जाणून घेऊया भोगीची भाजी खाण्याचे फायदे.

भोगीच्या भाजीचे फायदे (Bhogi 2024)

  • भोगीच्या भाजीमध्ये गाजर, वांगी, घेवडा, तीळ आणि हरभऱ्याची भाजी देखील टाकली जाते आणि शेंगदाणे घालून हि भाजी बनवली जाते.
  • वांग हि वातूळ असल्यामुळे अनेकवेळा ते न खाण्याचा सल्ला दिला जातो, पण आयुर्वेदामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत किंवा वांग्याची भाजी खाण्याचे फायदे सांगितले गेले आहेत.
  • शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून हे खाल्ल्याने शरीराला अधिक उर्जा मिळते. शिवाय त्वचेमधील कोरडेपणा देखील कमी होण्यास मदत मिळते.
  • या भाजीसोबत दुध, दही तूप, लोणी, ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण झाल्यास ती नियंत्रित राहते.
  • शरीराला उर्जा मिळण्यासाठी भोगीची भाजी खाल्ली जाते. त्याचबरोबर हि भाजी खाल्ल्याने आरोग्यासाठी याचे अनेक फायदे मिळतात.

भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी?

  • बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाणे उत्तम मानले जाते.
  • बाजरी हि शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक पदार्थ आहे.
  • बाजरीच्या पिठामध्ये तीळ मिसळून त्याची भाकरी बनवली जाते. हि भाकरी भोगीच्या भाजीसोबत स्वादिष्ट लागते.
  • दोन्ही उष्ण पदार्थ असल्यामुळे थंडीपासून शरीराचे संरक्षण होते.