अभिनेत्री, राजकारणी अन् अध्यात्माचा मार्ग; 35 वर्षीय गायिका आणि अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल

Mallika Rajput Death: संगीत क्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिंगर विजय लक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत तिच्या सुल्तानपुर स्थित घरामध्ये संशयास्पद मृत अढळली आहे. पोलिसांनुसार 13 फेब्रुवारी रोजी मल्लिका राजपूतचा मृतदेह तिच्या घरामधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मुलीच्या मृत्यूनंतर घरामध्ये शोककळा पसरली आहे.

मल्लिका राजपूतचे निधन

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मल्लिका राजपूतची आई सुमित्रा सिंहने सांगितले कि आम्ही घरामध्ये झोपलो होतो. काहीच माहिती झाले नाही. ती नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद होता. लाईट चालू होती. सकाळी कसातरी दरवाजा उघडला त्यावेळी मल्लिका पंख्याला लटकलेली आढळली. (Mallika Rajput Death)

कोण होती मल्लिका राजपूत?

35 वर्षाची मल्लिका राजपूत गायिका आणि अभिनेत्री होती. तिने 2014 मध्ये कंगना रनौतच्या रिव्हॉल्वर रानी चित्रपटामध्ये कम केले होते. या क्राईम कॉमेडी चित्रपटामध्ये मल्लिकाने सपोर्टिंग भूमिका केली होती. शिवाय ती सिंगर शानच्या यारा तुझे के म्युझिक व्हिडीओ मध्ये देखील दिसली होती. 2016 मध्ये मल्लिका राजपूतने भाजप मध्ये प्रवेश केला होता. तथापि तिने दोन वर्षानंतर राजकारण सोडून दिले.

आपले फिल्मी आणि राजकीय फ्लॉप झाल्यानंतर मल्लिका राजपूत अध्यात्माच्या मार्गावर गेली. 2022 मध्ये, तिची उत्तर प्रदेशच्या भारतीय सवर्ण संघाच्या राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाली. मल्लिका एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना देखील होती. पुढे तिने स्वत:ही गझल लिहायला सुरुवात केली, जी ती वेगवेगळ्या कविसंमेलनात परफॉर्म देखील करत होती.

रिपोर्ट्सनुसार, मल्लिका राजपूत स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील चालवत होती. चार वर्षांपूर्वी तिचा विवाह प्रदीप शिंदे नावाच्या व्यक्तीशी झाला होता. गायिकेच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याचेही बोलले जात आहे. मल्लिका राजपूतच्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. संगीत क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.

News Title: mallika rajput death news