Miss World 1994 Aishwarya Rai Viral Video: ऐश्वर्या राय बच्चन फक्त देशामध्येच नाही तर जगामध्ये देखील खूप फेमस आहे. आज ती बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती बच्चन कुटुंबाची सून आहे. सध्या ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या अफवा मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशामध्ये तिचा एक 29 वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो तेव्हाचा आहे जेव्हा ऐश्वर्या राय 1994 मध्ये मिस वर्ल्ड बनली होती.
29 वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल (Aishwarya Rai Viral Video)
19 नोव्हेंबर 1994 रोजी तिने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला होता. त्या दिवसांमध्ये तिच्या चेहऱ्यावरील चमक, सौंदर्य आणि निरागसपणा पाहण्यासारखा होता. ऐश्वर्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होता आहे. (Aishwarya Rai Viral Video) हा व्हिडीओ सुमारे 29 वर्षे जुना आहे. ज्यामध्ये ती एका टूरमध्ये पाहायला मिळत आहे. 1994-95 मिस वर्ल्ड टूर चा ऐश्वर्याचा हा खास व्हिडीओ (Aishwarya Rai Viral Video) सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालतो आहे.
व्हिडीओ ऐश्वर्या मरून कलरच्या साडी आणि फुल स्लीव्ह ब्लाउजमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर ती वेस्टर्न लुकमध्ये पाहायला मिळते. ज्यामध्ये ती टॉप घालून गळ्यामध्ये स्कार्फ अडकवलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्याचा हा लुक खूपच पसंद केला जात आहे. जवळ जवळ 29 वर्षे जुने ऐश्वर्या रायचे दोन्ही लुक चाहत्यांना आवडले आहेत. व्हिडीओ तिच्या चालण्यापासून ते तिच्या बोलण्याच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्ट खूप पसंद केली जात आहे.
जगभरामध्ये होतात ऐश्वर्याच्या सौंदर्याच्या चर्चा
मिस वर्ल्ड 1994 कॉम्पटीशनमध्ये विचारलेल्या प्रश्नांची चोख उत्तरे देऊन ऐश्वर्या रायने हा किताब जिंकला होता. स्पर्धेदरम्यान उपस्थित लोक तिच्या सौंदर्याचे आणि टॅलेंटचे वेडे झाले होते. जेव्हा ऐश्वर्याने विश्व सुंदरीचा ताज घातला होता तेव्हा संपूर्ण देश तिच्यावर फिदा झाला होता. अभिनेत्री जेव्हा हा किताब आपल्या नावावर केला होता तेव्हा ती 21 वर्षाची होती.
86 देशांच्या सुंदरींना मागे टाकून ऐश्वर्या बनली होती मिस वर्ल्ड
ऐश्वर्याने 86 देशाच्या सुंदरींना मागे टाकून हा ताज आपल्या नावावर केला होता आणि देशाला गौरव मिळवून दिला होता. तिच्यानंतर अनेक सुंदरींनी मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावावर केला पण आज जितकी चर्चा ऐश्वर्या रायची होते तितकी भारताच्या कोणत्याही सुंदरीची झाली नाही. मिस वर्ल्ड कॉन्टेस्टमध्ये जिंकल्यानंतर ऐश्वर्याला बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांचे ऑफर्स मिळाले. यानंतर तिने चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आणि त्याला आपले प्रोफेशन बनवले.
हेही वाचा: गौतमी पाटीलचा पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात ठुमका, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल