Mithun Chakraborty Health Update: बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी सकाळी छातीमध्ये दुखत असल्यामुळे कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये मिथुन चक्रवर्ती यांना दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले कि मिथुन यांना सकाळपासूनच खूप अस्वस्थ वाटत होते.
मुलाने दिली मिथुन यांनी हेल्थ अपडेट
मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने सांगितले (Mithun Chakraborty Health Update) कि, पाप 100 टक्के ठीक आहेत आणि त्यांचे हे रुटीन चेकअप आहे. पण तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद. तर हॉस्पीटलमध्ये उपस्थित मिथुन यांच्या जवळील व्यक्तीने सांगितले कि काळजी करण्याची काही गरज नाही ते ठीक आहेत. सध्या मिथुन यांना अटेंड करत असलेले डॉक्टर्स त्यांच्या सर्व टेस्ट करत आहेत. असे म्हंटले जात आहे कि मिथुन यांना छातीमध्ये दुखत होते.
मिथुन चक्रवर्ती यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव
नुकतेच मिथुन यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली गेली होती. अभिनेता आणि पॉलिटिशियनने या बातमीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना बंगालीमध्ये एक व्हिडीओ शेयर करून म्हंटले होते कि, मला गर्व आहे, मला हा पुरस्कार मिळाल्यामुळे खूप खुश आहे. मी सर्वांचा आभारी आहे. मी कधीच कोणाकडे स्वतःसाठी काही मागितले नाही. न मागताच काहीतरी मिळाल्याची भावना आज जाणवते आहे. हि एक छान भावना आहे.
मिथुन चक्रवर्ती वर्क फ्रंट
दरम्यान मिथुन यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ते डांस बांग्ला डांस या रियालिटी शो मध्ये मौनी रॉय, सुभाश्री गांगुली, सरबंती चटर्जी आणि पूजा बनर्जी यांच्यासोबत जज म्हणून दिसले होते. अभिनेत्याचा शेवटचा बंगाली चित्रपट काबुलीवाला होता. हा चीतग्र्प्त 2023 डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सुमन घोष यांनी केले होते.