New Ford Endeavour 2025 Price in india: फोर्ड इंडिया भारतीय मार्केटमध्ये आपली सर्वोत्तम एसयूव्ही फोर्ड एंडेवर परत आणण्याची तयारी करत आहे. अमेरिकेची दिग्गज कंपनी फोर्ड 2021 मध्ये भारतीय मार्केट सोडून गेली होती आणि आता मिडिया रिपोर्टनुसार आता भारतामध्ये फोर्ड पुन्हा परत येत आहे. फोर्डने भारतामध्ये परतण्यासाठी एक नवीन पेटंट देखील दाखल केले आहे आणि चेन्नईच्या प्लांटमध्ये पुन्हा परतण्याची तयारी करत आहे.
यासोबतच फोर्ड इंडियाने भारतीय मार्केटसाठी एक नवीन पेटंट देखील दाखल केले आहे. दाखल केलेल्या पेटंटमध्ये थायलंड मार्केटमध्ये उपलब्ध फोर्ड एवरेस्ट एसयूवी सारखी डिझाईन आहे. एकेकाळी एकेकाळी टोयोटा फॉर्च्युनरशी थेट स्पर्धा करणाऱ्या Ford Endeavour या नावाने हे मॉडेल भारतीय मार्केटमध्ये लाँच केले जाईल. आज देखील फोर्ड एंडेव्हरची सेकंड हँड मार्केट खूप मोठे आहे.
नवीन फोर्ड एंडेवर पेटंट
मिडिया रिपोर्टनुसार फोर्ड चेन्नई फॅक्टरीमध्ये आपली नवीन एंडेवर (New Ford Endeavour Patent) असेंबल करणार आहे, पण या व्यतिरिक्त कंपनी हे मॉडेल थेट आयात करण्याची देखील तयारी करत आहे. फोर्ड लवकरच भारतीय मार्केटमध्ये सध्याची एंडेवर आयात करू शकते. मिडिया रिपोर्टनुसार 2500 युनिट्स दर वर्षाला आयात केले जातील तर असेंबली लाइन ला 2025 पर्यंत सुरु केले जाईल.
तथापि पूर्णपणे आयात केलेल्या फोर्ड एंडेवरची किंमत भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या फॉर्च्युनरपेक्षा जास्त असण्याची शक्यात आहे. ज्यावेळी याचे उत्पादन भारतीय मार्केटमध्ये सुरु होईल तेव्हा हि किंमत खाली येऊ शकते. सध्या फोर्डजवळ भारतीय मार्केटमध्ये दोन प्लांट होते. एक सानंदमध्ये जे 2022 मध्ये टाटा मोटर्सला विकले होते आणि दुसरे चेन्नईमध्ये जे विनफास्ट सारख्या OEMS च्या नवीन ऑफर्स असून देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी ब्लॉक करण्यात आले.
नवीन फोर्ड एंडेवरची किंमत
आगामी फोर्ड एंडेवरची किंमत (New Ford Endeavour 2025 Price in India) भारतीय मार्केटमध्ये जवळ जवळ 60 लाख रुपये पासून सुरु होण्याचा अंदाज आहे. तर फॉर्च्युनरची किंमत 33.43 लाख ते 51.44 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.
फोर्ड एंडेवर डिझाईन
पेटंट केलेल्या स्पाय इमेजनुसार नवीन फोर्ड एंडेवरचे डिझाईन (Ford Endeavour 2025 Design) विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या रेंजर पिकअप ट्रकसारखी असणार आहे आणि ती या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. एक लॅडर फ्रेम आर्किटेक्चरवर आधारित एसयूव्ही असणार आहे. जी आकर्षक डिझाईन, अॅग्रेसिव लुक आणि पॉवरफुल इंजिन ऑप्शनसोबत सादर केली जाणार आहे.
यामध्ये समोरच्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध एवरेस्टचे डिझाईन पाहायला मिळणार आहे. तथापि अजूनपर्यंत कंपनीकडून याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. न्यू जनरेशन फोर्ड एंडेवर रोड प्रेझेन्स सध्याच्या मॉडेलपेक्षा खूप जास्त असणार आहे आणि ती फॉर्च्युनरला टक्कर देईल.
फोर्ड एंडेवर 2025 फीचर्स
कंपनीकडून अजूनपर्यंत याबद्दल कोणतीही अधिकृत माहित शेयर केलेली नाही. पण 12.3 इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह 12.4 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर अनेक फीचर्स सह (Ford Endeavour 2025 Features) हे मॉडेल सुसज्ज असणार आहे. हे ADAS टेक्निक आणि अनेक अॅडवांस फीचर्स सोबत सादर केले जाणार आहे, जे सध्या फॉर्च्युनरमध्ये उपलब्ध नाहीत.
Aspect | Details |
---|---|
Patent Filing | Design patent filed in India for the current-generation Endeavour (known as Ford Everest SUV in international markets) |
Job Openings | Ford has listed new job openings, hinting at a possible return to sales in India |
Chennai Plant U-turn | Ford, after initially planning to sell its Chennai plant, is now considering restarting operations in India |
Production Plans | Plan to assemble the Endeavour at the Chennai factory, with the option of direct imports |
Potential Launch | New Endeavour may arrive in India sooner than 2025, possibly as fully imported units before local assembly in 2025 |
Market Competition | Positioned to compete with rivals like the Toyota Fortuner, especially considering the Fortuner’s increased pricing |
Ford’s Plant Situation in India | Ford had two plants in India; one sold to Tata Motors in 2022, and the Chennai plant, which is now being reconsidered |
Relevance of Chennai Plant | Chennai plant previously produced the older Endeavour, making retooling for the new model relatively easier |
Reasons for Ford’s Exit in 2021 | Deal with Mahindra fell through, leading to the suspension of sales; Ford kept service operations ongoing |
New Endeavour Design Highlights | – Based on the Ranger pickup’s platform, featuring a boxier front end, Matrix LED headlights, and squared-off design |
Interior Features | Three-row cabin with a modern dashboard, a 12-inch touchscreen (10.1-inch on lower trims), and a 12.4-inch digital instrument cluster |
Safety and Technology | Nine airbags, hands-free parking, adaptive cruise control, lane keep assist, Pre-Collision Assist with Intersection Assist |
Powertrain Options | Two 2.0-litre turbo-diesel (single and twin-turbo), new 3.0-litre V6 turbo-diesel, with 6-speed manual and 10-speed automatic transmissions |
Global Market Name | Known as Ford Everest SUV in international markets |
फोर्ड एंडेवर 2025 इंजिन
मॉन्स्टर एसयूव्हीला बोनेटच्या खाली उर्जा देण्यासाठी फोर्ड रेंजरचे इंजिन (Ford Endeavour 2025 Engine) वापरले जाण्याची शक्यता आहे. हे 2.2 लीटर टर्बो डिझेल आणि 3.0 लीटर V6 टर्बो डिझेल इंजिनसह संचालित केले जाऊ शके. सहा स्पीड मॅन्युअल आणि 10 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह दिले जाणार आहे. यासोबतच उत्कृष्ट ऑफ-रोडिंगसाठी 2WD आणि खराब रस्त्यांसाठी 4WD ची सुविधा मिळणार आहे. सर्व व्हील ड्राइव्ह टेक्नॉलॉजी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे, तर खालच्या व्हेरियंटमध्ये रियर व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान दिले जाईल.
Ford Endeavour 2025 भारतात लाँचिंग डेट
काही मिडिया रिपोर्टनुसार न्यू जनरेशन आगामी फोर्ड एंडेवर भारतीय मार्केटमध्ये 2025 पर्यंत लाँच (Ford Endeavour 2025 Launch Date in India) होऊ शकते. तथ्पाई याची पुष्टी कंपनीने केलेली नाही. लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा: Tata Punch EV झाली लाँच, फक्त 21 हजारात घरी आणा हि जबरदस्त कार, जाणून घ्या फीचर्स