New Suzuki Swift Sportier: जानेवारीमध्ये लाँच होणार ‘हि’ नवीन स्विफ्ट, लाँचिंगच्या अगोदर जाणून घ्या काय-काय असणार खास

New Suzuki Swift Sportier: नवीन स्विफ्ट भारतामध्ये लवकरच लाँच होणार आहे. यासोबत याच्या स्पोर्टी व्हर्जनला देखील लाँच केले जाईल. सुजुकी स्विफ्ट च्या स्पोर्टी व्हर्जन पिवळ्या रंगामध्ये सादर केले जाणार आहे. शिवाय कारने अनेक खास बदल देखील पाहायला मिळतील, ज्यामध्ये डिझाईन अपडेट्स देखल सामील आहेत.

सुझुकीने नुकतेच चौथ्या पिढीची स्विफ्ट हॅचबॅक जागतिक बाजारपेठेत लाँच केली आहे. हि नवीन स्विफ्ट तीन व्हेरिएंट, नवीन 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड टेक्नोलॉजी सोह्त उपलब्ध आहेत. मारुती सुजुकी लवकरच भारतामध्ये या कारला लाँच करणार आहे. याची टेस्टिंग आधीपासूनच सुरु झाली आहे.

New Suzuki Swift Sportier

नवीन मारुती सुजुकी स्विफ्टमध्ये अनेक शानदार बदल पाहायला मिळती. यासोबत कंपनी स्विफ्टचे स्पोर्टी व्हर्जन देखील घेऊन येणार आहे. जी जानेवारी 2024 मध्ये Tokyo Auto Salon मध्ये सादर केली जाणार आहे. सुजुकी कडून याचे काही फोटो देखील सादर करण्यात आले आहेत. हि कार कॉन्सेप्ट मॉडल म्हणून लाँच केली जाईल अशा आशा आहे.

New Suzuki Swift Sportier चे डिझाईन

फोटोनुसार स्पोर्टी सुजुकी स्विफ्ट च्या फ्रंट आणि बॅक साईडमध्ये अनेक कॉस्मेटिक अपडेट केले जातील. हॅचबॅकच्या दरवाजांनाही स्पोर्टी लूक दिला जाईल. शिवाय कारला नवीन डिझाइनचे एलईडी हेडलॅम्प, नवीन टेल लाइट्स, ग्लॉसी ब्लॅक फ्रंट स्किड प्लेट आणि अलॉय व्हील्स देण्यात येणार आहेत. नवीन जनरेशनची स्विफ्ट अपडेटेड HEARTECT प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल आणि नवीन Dezire देखील त्याच प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.

New Suzuki Swift Sportier चे फीचर्स

New Suzuki Swift Sportier च्या इंटीरियरमध्येही अनेक बदल पाहायला मिळतील, ज्यामध्ये अनेक गोष्टी फ्रोंक्स आणि बलेनो मिळत्या-जुळत्या असतील. कारच्या इंटीरियरमध्ये ड्युअल टोन कलर थीम दिली जाईल. यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, क्लायमेट कंट्रोल साठी टॉगल स्विच सारखे फीचर्स असतील.

New Suzuki Swift Sportier

New Suzuki Swift Sportier चे इंजिन

नवीन स्विफ्ट पेट्रोल आणि हायब्रीड पॉवरट्रेनसह लाँच केली जाईल. या हॅचबॅकमध्ये 1.2 लीटर, DOHC, 12V इंजिन दिले जाईल. हा सेटअप 5700rpm वर 82bhp पॉवर आणि 4500rpm वर 108Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात येईल. तथापि, अशी अपेक्षा आहे की कारचे भारतीय मॉडेल देखील AMT गिअरबॉक्स ऑप्शन सोबत देखील येईल.

हेही वाचा: Bolero Neo Plus: महिंद्रा लवकरच सादर करत आहे 9-सीटर बोलेरो, जाणून घ्या कधी होणार लाँच