Nothing ने ‘Now or Nothing’ सेलची घोषणा केली आहे, ज्यामध्ये Nothing आणि CMF ब्रँडच्या अनेक उत्पादनांवर आकर्षक डील्स उपलब्ध आहेत. ही सेल मर्यादित कालावधीसाठी आहे. सेलचा फायदा घेऊन तुम्ही Nothing Phone 3a सिरीज, CMF Phone 2 Pro, Nothing Ear, Nothing Ear a, CMF Buds Pro आणि CMF Buds Pro 2 स्वस्तात खरेदी करू शकता.
या स्मार्टफोन आणि TWS ईयरबड्स व्यतिरिक्त कंपनी इतर उत्पादनांवरही सवलत देत आहे. जर तुम्ही नवीन फोन किंवा ऑडिओ प्रॉडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी नक्की वापरून बघा. चला तर जाणून घेऊया या फोनच्या खास वैशिष्ट्यांची.
सेलमध्ये काय खास?
ब्रँडच्या म्हणण्यानुसार, या सेलमध्ये Nothing Phone 3a Pro स्वस्तात मिळू शकतो. सेलमध्ये फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, जो कंपनीने 29,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. यावर 1000 रुपयांची किंमत सूट आणि 2000 रुपयांचा बँक ऑफर आहे.
तसेच Nothing Phone 3a देखील तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 24,999 रुपयांत लॉन्च झालेल्या या हँडसेटवर 2000 रुपयांचा बँक ऑफर आहे. तर CMF Phone 2 Pro तुम्हाला 17,999 रुपयांत मिळेल. यावर 1000 रुपयांचा बँक ऑफर आहे.
स्वस्तात मिळत आहेत ईयरबड्स
Nothing Ear आणि Nothing Ear A देखील तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. या डिव्हाइसेसची सुरुवातीची किंमत अनुक्रमे 11,999 रुपये आणि 7,999 रुपये होती. सेलमध्ये तुम्ही या डिव्हाइसेस 8,499 रुपये आणि 5,499 रुपयांत खरेदी करू शकता.
तर CMF Buds, CMF Buds Pro आणि CMF Buds Pro 2 अनुक्रमे 1,999 रुपये, 2,499 रुपये आणि 3,499 रुपयांत उपलब्ध आहेत. CMF Neckband Pro तुम्हाला 1,899 रुपयांत मिळेल. त्याचप्रमाणे CMF Watch Pro आणि CMF Watch Pro 2 सेलमध्ये 2,999 रुपये आणि 4,199 रुपयांत मिळत आहेत.
जर तुम्हाला चार्जर खरेदी करायचा असेल, तर Nothing च्या सेलमध्ये त्यावरही ऑफर मिळणार आहे. येथे तुम्ही 100W आणि 140W चे Nothing चार्जर अनुक्रमे 2,999 रुपये आणि 3,499 रुपयांत खरेदी करू शकता. 11 जूनपासून सुरू झालेली Nothing ची सेल 15 जूनपर्यंत चालेल. तुम्ही हे आयटम Flipkart, Myntra, Vijay Sales, Croma आणि इतर रिटेल स्टोअरवरून खरेदी करू शकता.
हे पण वाचा :- Vivo T4 Ultra 5G लॉन्च, 5500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा, किंमत एवढी आहे