अखेर ‘दगडू’च्या लग्नाची तारीख ठरली! प्रथमेश परबच्या केळवणाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

Prathamesh Parab Wedding: मनोरंजन जगतामधील अनेक कपल सध्या विवाह बंधनात अडकत आहेत. स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडलकर, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, सुरुची अडारकर-पीयूष रानडे या कलाकारांनी नुकतेच लग्न करून आपल्या आयुष्याच्या नवीन अध्याय सुरु केला आहे.

आता लवकरच आणखी अभिनेता या लिस्टमध्ये सामील होणार आहे. टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्याच्या होणाऱ्या पत्नीने दोघांच्या केळवणाचे फोटो इंस्टाग्रामवर शेयर करून लग्नाची तारीख ठरल्याचे सांगितले आहे. टाईमपास, बालक-पालक, ताजा खबर, दृश्यम अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रथमेश परब पाहायला मिळाला होता.

आता अभिनेता लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात (Prathamesh Parab Wedding) अडकणार आहे. प्रथमेशच्या गर्लफ्रेंडचे नाव क्षितीजा घोसाळकर आहे. दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचे फोटो अनेकवेळा सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आता लवकरच दोघे लग्न करणार आहेत. त्यांचे केळवण नुकतेच पार पडले आहे. क्षितीजाने दोघांच्या केळवणाचे फोटो शेयर करून बाकी तारीख लवकरच कळवतो असे म्हंटले आहे.

केळवण स्पेशल पोस्ट?Prathamesh Parab Wedding

क्षितिजा आणि प्रथमेश यांच्या केळवणाचा खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता. फुलांची आरास, फुगे आणि चॉकलेट्सही सजावट करण्यात आली होती. क्षितीजाने याचा फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये प्रतिजाचं ठरलंय हा! असं लिहील आहे, आणि नंतर तारीख लवकरच जहीर केली जाईल असं देखील लिहिलं आहे. तारीख खूपच स्पेशल आहे हिंट कॅप्शनमध्ये दिली आहे, तोवर… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Happppppy “२०२४”. कमेंटमध्ये गेस करा असं देखील लिहिलंय.

चाहते आता दोघांच्या फोटोवर कमेंट करून लग्नाच्या तारखेचा अंदाज लावत आहे. क्षीतीजानेने कमेंटमध्ये 2024 ला हायलाईट केले आहे म्हणजेच त्यांच्या लग्नाची तरीखी या आकड्यांमध्ये दडली असणार. अनेकांनी कमेंटमध्ये लग्नाची तारीख व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारी असेल असा अंदाज करत कमेंट केली आहे. दोघांच्या केळवणाचा फोटो समोर आल्यानंतर आता त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर तुम्हाला काय वाटते, त्यांच्या लग्नाची तारीख काय असू शकते, हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

हेही वाचा: Gautami Deshpande Wedding : अखेर गौतमी देशपांडे झाली विवाहबद्ध; मराठमोळ्या पद्धतीने पार पडला विवाहसोहळा