आलिया-रणबीरची चाहत्यांना स्पेशल भेट, ख्रिसमसचे औचित्य साधत दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल

Ranbir Alia Daughter Raha Pictures: रणबीर कपूर आणि आलिया भट्टने ख्रिसमसचे औचित्य साधत चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. कपलने त्यांची लाडकी मुलगी राहाचा चेहरा रीवील (Raha Kapoor Face Reveal) केला आहे. कपलचे चाहते त्यांच्या लाडक्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी खूपच उत्सुक होते. आता कपलने त्यांची इच्छा पूर्ण केली आहे.

रणबीर-आलियाने ख्रिसमसच्या दिवशी दिले खास गिफ्ट (Ranbir Alia Daughter Raha Pictures)

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस लंचवर कपलने राहाला पहिल्यांदाच पॅप्सच्या समोर आणले. सोशल मिडियावर याचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. जिथे रणबीर कपूर आणि आलिया पहिल्यांदाच आपल्या लहानग्या मुलीला मिडियासमोर घेऊन आले. वडिलांच्या कडेवर राहा खूपच शांत दिसली. तर एक वर्षाच्या राहाच्या निळे डोळे, निरागस आणि प्रेमळ हास्यावर चाहते फिदा झाले आहेत. रणबीर-आलियाची मुलगी खूपच क्युट आहे.

लोक क्युट राहावरून नजर हटवू शकत नाही आहेत. व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर राहाची पहिली झलक समोर येताच चाहत्यांमध्ये डिबेट सुरु झाला आहे. अनेक लोकांना म्हंटले आहे कि राहा कपूर कुटुंबावर गेली आहे. बहुतेक लोकांनी राहा हुबेहूब ऋषी कपूर सारखी दिसत असल्याचे म्हंटले. अनेक सोशल मिडिया युजर्सनी लिहिले आहे कि राहा तिच्या आजोबावर गेली आहे.

raha kapoor

रणबीर-आलियाने जिंकली चाहत्यांची मने

सोशल मिडिया व्हायरल होत असलेल्या राहाच्या क्युट फोटोंनी (Ranbir Alia Daughter Raha Pictures) लोकांची माने जिंकली आहेत. हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि आज रणबीर आणि आलियाने चाहत्यांना हे गिफ्ट देऊन त्यांचा दिवस चांगला बनवला आहे. नुकतेच रणबीर आणि आलियाने राहाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. कपलने एप्रिल 2022 मध्ये लग्न केले होते आणि नोव्हेंबर 2022 मध्ये आलियाने मुलगी राहाला जन्म दिला होता.

हेही वाचा: गोवा बीचवर बिकिनी डांस करताना दिसली अजय देवगनची ऑनस्क्रीन पत्नी, व्हायरल झाला व्हिडीओ