Seema Haider: प्रेमामध्ये पडून उत्तर प्रदेशच्या नोएडापर्यंत पोहोचणारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर आता राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रालोद ने याबदल मोठे संकेत दिले आहेत. पाकिस्तानमधून चार मुलांसोबत सीमा ग्रेटर नोएडा च्या रबूपुरा गावामध्ये पोहोचली. चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये पबजी गेम द्वारे रबूपुरा चा सचिन मीणा आणि पाकिस्तानमधील कराची येथील राहणारी सीमा हैदर एकमेकांच्या संपर्कामध्ये आले होते.
दोघांची मैत्री प्रेमामध्ये बदलली. यानंतर सीमा पाकिस्तानहून यूएईमार्गे नेपाळला पोहोचली. तिथून बसद्वारे ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा पर्यंत पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून नेहमी चर्चा होत आहे. तिच्या आयएसआयशी असलेल्या संबंधांचा देखील तपास करण्यात आला. तथापि एजन्सीला कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. सचिनसोबत लग्न करणारी सीमाबद्दल अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.
काय आहे प्रकरण?
मथुराच्या राजकारणामध्ये विजय मिळवण्यासाठी आता रालोदने जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मथुरेतून कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी पक्षाने पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर (Seema Haider) ला निवडणूक प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मथुरेच्या राजकारणामध्ये पार्टी मोठी खेळी कार्नाय्च्या विचार करत आहे. रालोद च्या शिष्टमंडळाने रघुपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सीमा हैदर यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
कोणी दिली ऑफर?
दरम्यान रालोदचे प्रदेश उपाध्यक्ष कुंवर नरेंद्र सिंह यांनी सांगितले कि पक्षाचे वरिष्ठ अधिकारी ठा. किशोर सिंह, गोविंद, स्वतंत्र पाल सिंह इत्यादी एका लग्न समारंभामध्ये गेले होते. तिथे त्यांची भेट सीमा हैदरसोबत झाली. असे म्हंटले जात आहे कि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सीमा हैदरला आमंत्रित करण्यात आले आहे. सीमाने देखील मथुराला येण्याचे आश्वासन दिले आहे.
सीमा हैदरने व्यक्त केली इच्छा
यावेळी सीमा हैदरने एक इच्छा देखील व्यक्त केली. ती म्हणाली कि, तिला वृंदावनचे प्रेम मंदिर पाहण्याची इच्छा आहे. सीमा हैदर आता रालोदचा प्रचार करताना पाहायला मिळणार यामध्ये काही शंका नाही. सध्या सीमा हैदर खूपच फेमस झाली आहे. अनेक लोक तिला भेटण्यासाठी येत असतात. सोशल मिडियावर देखील ती खूप फेमस झाली आहे.