Sheetal Universal IPO GMP: एग्री कमोडिटीजचा सप्लायर शीतल यूनिवर्सल (Sheetal Universal) चा आयपीओ सोमवारी 4 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. Sheetal Universal IPO एक एसएमई आईपीओ (SME IPO) असणार आहे. यामध्ये शेयर्सचा प्राईस फिक्स्ड राहणार आहे. आयपीओ खुलण्यापूर्वी कंपनीचा शेयर ग्रे-मार्केट मध्ये प्रीमियमवर आहे. म्हणजेच नफ्याचे संकेत देत आहे.
Sheetal Universal IPO शेयर्स प्राईस
शीतल युनिव्हर्सलचा आयपीओ 6 डिसेंबरला बंद होईल आणि शेयर्सचे अलॉटमेंट 7 डिसेंबर रोजी होण्याची आशा आहे. शीतल युनिव्हर्सलचा IPO 23.80 रुपये इतका आहे. जो पूर्णपणे 34 लाख इक्विटी शेयर्सचा एक फ्रेश इश्यू आहे. यामध्ये कोणतेही ऑफर-फॉर-सेल (ओएफएस) नाही आहे. म्हणजेच प्रमोटर किंवा शेयरधारक शेयर विकणार नाहीत. आयपीओमध्ये शेयर्सची प्राईस 70 रुपये पर शेयर निश्चित करण्यात आली आहे.
IPO मध्ये किमान गुंतवणूक किती असेल
IPO मध्ये लॉट साइज 2,000 शेअर्स इतकी आहे. म्हणजेच तुम्हाला किमान 2000 रुपयांच्या शेअर्ससाठी आणि नंतर त्याच्या पटीत अर्ज करावा लागेल. अशाप्रकारे रिटेल गुंतवणूकदारांसाठी आवश्यक असलेली किमान गुंतवणूक रक्कम 140,000 रुपये इतकी असेल.
कितीवर गेला GMP
IPO वॉचनुसार, शीतल युनिव्हर्सलचा ग्रे-मार्केट प्रीमियम किंवा GMP 7 रुपये आहे. म्हणजेच ग्रे मार्केटमधील हिस्सा 10 टक्के प्रीमियमवर आहे. परंतु हे GMP लिस्टिंगपर्यंत वाढू किंवा कमी देखील होऊ शकते.
हेही वाचा
==> Upcoming IPO: खात्यामध्ये पैसे ठेऊन Ready राहा, डिसेंबरमध्ये येणार आहेत या कंपन्यांचे IPO