Shree Swami Samarth Tarak Mantra श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (इ.स. १८५६-१८७८) २२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. “मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
श्री स्वामी समर्थ तारकमंत्र पठन Shree Swami Samarth Tarak Mantra
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य
अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविणा
काळही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी.
उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे
जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा, अशक्यही शक्य करतील स्वामी.
खरा होई जागा श्रद्धेस हित कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त आठव कितीदा
दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्यही शक्य करतील स्वामी.
विभूती नमननाम ध्यानादी तिर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तिर्थ घेई
आठवी रे प्रचिती न सोडती तयाजया स्वामी घेई हाती अशक्यही शक्य करतील स्वामी.