OLA ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये आली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, 150 Km पेक्षा जास्त रेंज, किंमत फक्त

Simple Energy Electric Scooter: सिंपल एनर्जी (Simple Energy) आपली लेटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम प्राईस (Simple Energy Electric Scooter price) 99,999 रुपये इतकी आहे. जानेवारी 2024 मध्ये कंपनी या स्कूटरची नवीन किंमत जरी करणार आहे. लाँचिंगसोबत कंपनीने या स्कूटरची ऑनलाइन प्री-बुकिंग देखील सुरु केली आहे. हि स्कूटर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाइन बुक करू शकता. या स्कूटरची स्पर्धा ओला, एथर, टीव्हीएस या मॉडेल्स सोबत होणार आहे.

Simple Energy Dot One बॅटरी

कंपनीने सध्या या इलेक्ट्रिक स्कूटरला फक्त सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. डॉट वन फिक्स्ड बॅटरीने सुसज्ज असेल. हि स्कूटर सिंगल चार्जवर 151Km ची रेंज देईल. हि स्कूटर तुम्ही चार कलर ऑप्शन नम्मा रेड, ब्रेझन ब्लॅक, ग्रेस व्हाइट आणि एज्योर ब्लू मध्ये खरेदी करू शकाल. डॉट वन 750W चार्जर सोबत येते. कंपनीचा दावा आहे कि सर्वात पहिला या स्कूटरची डिलिव्हरी बेंगलोरमध्ये केली जाणार आहे. ज्यानंतर इतर शहरांमध्ये देखील या स्कूटरची डिलिव्हरी होईल.

परफॉर्मन्स

Simple Energy One स्कूटरच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर 2.7 सेकेंड मध्ये 0 ते 40 किमी प्रति तास वेग पकडू शकते. हि 3.7kWh बॅटरी पॅकसह येते. यामध्ये 8.5kW इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 72Nm टॉर्क जनरेट करते. स्कूटरला ट्यूबलेस टायरचा वापर करण्यात आला आहे. या ई-स्कूटरमध्ये 12-इंच व्हील, टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट पॅनल, CBS, दोन्ही व्हील्सवर डिस्क ब्रेक आणि 35-लीटर अंडर-सीट स्टोरेज मिळतो. यामध्ये अॅप कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे.

Simple Energy Electric Scooter

सिंपल एनर्जी (Simple Energy) चे संस्थापक अध्यक्ष आणि CEO सुहास राजकुमार म्हणाले कि हा सिंपल एनर्जी च्या इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण क्षण आहे कारण आम्ही सिंपल डॉट वन लाँच करत आहोत. आमच्या विस्तारित पोर्टफोलिओमध्ये सर्वात नवीन सदस्य आहे. आमच्या आदरणीय ग्राहकांना अत्याधुनिक फीचर्ससह जबरदस्त डिझाईनचे सहज मिश्रण करत एक उच्च दर्जाचा परंतु परवडणारा इलेक्ट्रिक मोबिलिटी अनुभव प्रदान करण्यासाठी.

हेही वाचा: फक्त 20 हजारात घरी घेऊन जा TVS ची हि स्कूटर ! 145 किमी रेंज, 82 किमी टॉप स्पीड आणि बरेच काही खास…