प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल, लग्नामुळे कपल होते चर्चेत

South Actress Mahalakshmi Husband Hospitalized: सिनेमाजगतामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सध्या कठीण काळामधून जात आहे. तिच्या पतीची प्रकृती बिघडली आहे. सध्या ICU मध्ये ठेवले गेले आहे. तुम्हाला माहितीच असेल कि साऊथ टीव्ही अभिनेत्री महालक्ष्मी (Actress Mahalakshmi) तिच्या लग्नामध्ये खूपच चर्चेमध्ये राहिली होती. तिने जेव्हा लग्न केले होते तेव्हा तिला आणि तिच्या पतीला खूप ट्रोल केले गेले होते. फक्त रंगावरूनच नाही तर लठ्ठपणामुळे देखील महालक्ष्मीचा पती रविंद्र चंद्रशेखर (Ravindar Chandrasekaran) लोकांच्या निशाण्यावर आला होता. आता अशामध्ये महालक्ष्मीच्या पतीबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे.

श्वास घेण्यास त्रास (South Actress Mahalakshmi Husband Hospitalized)

प्रसिद्ध निर्माता आणि लिब्रा प्रोडक्शंसचे मालक रविंद्र चंद्रशेखर यांना उपचारासाठी आठवडाभरापासून हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये (South Actress Mahalakshmi Husband Hospitalized) दाखल करण्यात आले आहे. इतकेच नाही तर त्यांच्या प्रकृतीविषयी इतर माहिती देखील समोर आली आहे. वास्तविक रविंद्र चंद्रशेखर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर आता त्यांच्या नाकामध्ये ऑक्सीजन ट्यूब लावली गेली आहे. त्यांना लंग इन्फेक्शन झाले होते. यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना 1 आठवडा हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार आहे. (South Actress Mahalakshmi Husband Hospitalized)

South Actress Mahalakshmi Husband Hospitalized

प्रसिद्ध चित्रपट निर्माता

चाहत्यांनी त्यांना आता रिक्वेस्ट केली आहे कि जोपर्यंत ते पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांनी बिग बॉसचे रिव्ह्यू करू नये आणि काही काळासाठी ब्रेक घ्यावा. तमिळ अभिनेत्री महालक्ष्मीचे पती प्राईव्हेट युट्युब चॅनेलवर रिव्ह्यू करतात. त्यांना यासाठी खूप पसंद केले जाते. महालक्ष्मीचे पत्नी असण्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये त्याला प्रसिद्ध प्रोड्युसर म्हणून देखील ओळखले जाते. 2013 मध्ये त्यांनी Sutta Kadhai चित्रपट प्रोड्यूस केला होता. यानंतर त्यांनी 2014 मध्ये Nalanum Nandhiniyum, Kolai Nokku Paarvai आणि 2017 मध्ये Kalyanam सारखे चित्रपट प्रोड्यूस केले होते.

लग्नानंतर झाले ट्रोल

महालक्ष्मीच्या पतीचे हे दुसरे लग्न होते. या लग्नाच्या अगोदर त्यांचे घटस्फोट झाला होता. 2022 मध्ये टीव्ही अभिनेत्री महालक्ष्मी सोबत त्यांनी लग्न केले होते. त्यांचे लग्न खूपच वादग्रस्त ठरले होते कारण सोशल मिडियावर त्यांचे फोटोज समोर येताच लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले होते. ज्यानंतर त्यांना बॉडी शेमिंगचा देखील सामना करावा लागला होता. इतकेच नाही तर लोकांनी हे देखील म्हंटले होते कि अभिनेत्री महालक्ष्मीने फक्त पैशांसाठी रविंद्र सोबत लग्न केले होते.

हेही वाचा: ‘निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर…’, ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्रीच्या वक्तव्याने एकच खळबळ