Talathi Bharti – तलाठी भरती परीक्षेमधील तब्बल 2831 प्रश्नांवर 16 हजार 205 उमेदवारांकडून आक्षेप आले असून 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे Talathi Bharti – तलाठी भरती निकालास विलंब हॉट आहे. आठ लाख उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. निकालाचे काम युद्धपातळीवर सुरु असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल जहीर होऊ शकतो अशी शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.
Talathi Bharti – तलाठी भरती परीक्षेसाठी लाखो अर्ज
Talathi Bharti – तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. छाननीनंतर 4466 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधील 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे तीन टप्प्यांमध्ये आणि दिवसातील तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांना प्रश्न आणि उत्तरपत्रिकेमधील काही हरकत असल्यास त्या नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली गेली होती.
संपूर्ण परीक्षेमध्ये एकूण 2831 प्रश्नांवर 16 हजार 205 उमेदवारांनी हरकती नोंदवल्या आहेत. हरकतींपैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. हरकती नोंदवण्याच्या कालावधीमध्ये आलेल्या हरकतींपैकी नऊ हजार हरकती टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले.
उमेदवारांची मोठी संख्या आणि आक्षेप पाहता संपूर्ण प्रक्रियेला आणि निकालाला विलंब झाल्याची माहिती नरके यांनी दिली. निकालासंबंधी बरेच काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी आणि जिल्हानिहाय निकाल याचे काम सुरु आहे. त्यामुळे जानेवारी पर्यंत Talathi Bharti – तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागू शकतो.
उमेदवारांची संख्या खूप मोठी होती त्यामुळे कोणत्याही उमेदवारावर अन्याय व्हायला नको म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न करता निकाल तयार करणे सुरु आहे. पुढील दोन दिवसांमध्ये निकालासंबंधात बातमी देण्यात येईल. जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी म्हंटले आहे.
महत्वाची लिंक
तलाठी भरतीच्या अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा | Click Here |