Tata Group Will Provide 1 Crore Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी एका विमानाचा अपघात झाला. एअर इंडियाच्या या विमानात २४२ जण प्रवास करत होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या विमानात केवळ एकच व्यक्ती जिवंत वाचला आहे. तर उर्वरित लोकांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या देखील बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. तसेच विमान अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी टाटा ग्रुपने मोठा निर्णय घेतला आहे.
Tata Group ने अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं
टाटा संसचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी लिहिले आहे, “एअर इंडिया फ्लाइट १७१ शी संबंधित दुःखद घटनेमुळे आम्हाला अतिशय वेदना होत आहेत. सध्या आम्ही अनुभवत असलेले दुःख शब्दांत मांडता येणार नाही. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदनाचं आणि प्रार्थनांचं सहवास आहे तसेच जखमी झालेल्यांसाठी देखील.”
प्रत्येकाला १-१ कोटी रुपयांची भरपाई
याशिवाय टाटा संसकडून नुकसानभरपाईची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, “टाटा समूह या दुःखद घटनेत प्राण गमावलेल्यांच्या प्रत्येक कुटुंबाला १ कोटी रुपयांची आर्थिक मदत करेल. तसेच जखमींच्या उपचार खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू आणि त्यांना आवश्यक ती सर्व काळजी आणि सहाय्य मिळेल याची खात्री करू. याशिवाय, आम्ही बी जे मेडिकलच्या छात्रावासाच्या बांधकामासाठी मदत करणार आहोत. या अवर्णनीय काळात प्रभावित कुटुंबे आणि समाजासोबत आम्ही उभे आहोत.”
We are deeply anguished by the tragic event involving Air India Flight 171.
— Tata Group (@TataCompanies) June 12, 2025
No words can adequately express the grief we feel at this moment. Our thoughts and prayers are with the families who have lost their loved ones, and with those who have been injured.
Tata Group will…
एकच व्यक्ती जिवंत राहिला
माहितीप्रमाणे या फ्लाइटमध्ये जिवंत राहिलेल्या व्यक्तीची ओळख रमेश विश्वास कुमार अशी झाली आहे. हा प्रवासी बोईंग ७८७ ड्रीमलाइनरच्या ‘११A’ आसनावर बसलेला होता, ज्यात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. तो आपल्या भावासोबत लंडनकडे जात होता. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा वार्डमध्ये कार्यरत डॉ. शरीक एम यांनी सांगितले की रमेश विश्वास कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानात दोन पायलट आणि १० चालक दल सदस्यांसह एकूण २४२ जण होते. एअर इंडियाच्या माहितीनुसार, विमानातील २३० प्रवाशांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते.
हे पण वाचा :- Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात एकमेव जिवंत वाचलेल्याचा व्हिडिओ समोर आला, बाल-बाल वाचले