टीव्हीवर का दाखवत नाहीत रितेश-जेनेलियाचा ‘तुझे मेरी कसम’ चित्रपट, Tujhe Meri Kasam अखेर २० वर्षांनंतर कारण आलं समोर

Tujhe Meri Kasam Movie: रितेश आणि जेनेलिया हे क्युट कपल सध्या वेड चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. दोघांचा वेड चित्रपट नुकतेच रिलीज झाला आहे. ज्याने सध्या दर्शकांना सुद्धा वेड लावले आहे. रितेश आणि जेनेलिया हि जोडी महाराष्ट्राच्या दर्शकांच्या लाडक्या जोडींपैकी एक आहे.रितेश देशमुख आणि जेनेलिया हे तुझे मेरी कसम चित्रपटामधून सर्वात पहिला एकत्र आले होते. चित्रपटामधील केमेस्ट्री दर्शकांना खूपच आवडली होती. तुझे मेरी कसम चित्रपटाला २० वर्षे झाली आहेत. ३ जानेवारी २००३ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.

याच्या चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जेनेलिया यांच्यामध्ये जवळीक वाढली होती आणि पुढे ते एकमेकांना डेट करू लागले. आता पुन्हा रितेश आणि जेनेलिया यांची जोडी चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. रितेश आणि जेनेलिया त्यांचा तुझे मेरी कसम चित्रपट खूपच कमी लोकांनी पाहिला असेल. गेल्या २० वर्षांमध्ये Tujhe Meri Kasam हा चित्रपट टीव्हीवर कधीच दाखवण्यात आला नाही किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज झाला नाही. आता त्याचे कारण समोर आले आहे.

Tujhe Meri Kasam

Tujhe Meri Kasam OTT

तुझे मेरी कसम चित्रपटाची निर्मित रामोजी राव यांनी केली होती. हा चित्रपट लोकांनी चित्रपटगृहांमध्ये येऊन पुन्हा पुन्हा पहावा असे त्यांचे मत होते. त्यामुळे रामोजी राव यांनी या चित्रपटाचे राइट्स विकलेच नाहीत. टीव्ही तेच चित्रपट दाखवता येतात ज्यांचे राइट्स त्यांनी विकत घेतलेले असतात.तुझे मेरी कसम चित्रपट २००३ मध्ये रिलीज झाला होता त्यानंतर याचे डिजिटल राइट्ल कोणालाही विकले गेले नाहीत ज्यामुळे आज देखील हा चित्रपट टीव्हीवर दाखवता येत नाही. याच कारणामुळे रितेश आणि जेनेलियाचा तुझे मेरी कसम (Tujhe Meri Kasam) चित्रपट अजून पर्यंत टीव्हीवर दाखवता आलेला नाही.

Riteish Deshmukh Movie Ved

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या वेड (Ved) चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून फक्त याच चित्रपटाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला दर्शकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सैराट नंतर वेड चित्रपट सर्वाधिक कमी करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

वेड चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसांमध्ये अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याच्या सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड वेड चित्रपटाने मोडीत काढला आहे.त्याचबरोबर रितेशच्या लय भारी चित्रपटाचा रेकॉर्ड देखील वेड चित्रपटाने मोडला आहे. आता या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटां यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शच्या माहितीनुसार वेड हा सर्वात जास्त कमाई कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

ved movie

Tujhe Meri Kasam Video Songs

Youtube Video

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

हेही वाचा
==> Ved Lavlay Lyrics – Vishal Dadlani & Ajay Gogavale | Riteish Deshmukh