Union Bank Vacancy 2025 : यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने तरुणांसाठी उत्तम संधी दिली आहे. बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ५०० पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यात असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) आणि असिस्टंट मॅनेजर (आयटी) या दोन्ही पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी यूनियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. भरतीशी संबंधित सर्व आवश्यक माहिती खाली दिली आहे…
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी उमेदवार २० मे २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भरतीसाठी पदसंख्या
या भरतीत एकूण ५०० रिक्त पदे भरली जातील. त्यापैकी २५० पदे असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) आणि २५० पदे असिस्टंट मॅनेजर (आयटी) साठी राखीव आहेत. बँकेच्या या भरतीसाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता काय असावी?
असिस्टंट मॅनेजर – क्रेडिट: कोणत्याही विषयात बॅचलर पदवी असून BCA, CMA, ICWA, CS किंवा फायनान्समध्ये तज्ज्ञता असलेले MBA/PGDM/PGDBM पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
असिस्टंट मॅनेजर – आयटी: संगणक शास्त्र, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सायन्स, AI, सायबर सिक्योरिटी सारख्या तांत्रिक विषयांत BE/BTech, MCA, MSc (IT), MTech किंवा समकक्ष पदवी आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि फीची माहिती
उमेदवारांची वयमर्यादा २२ ते ३० वर्षे असावी. मात्र, आरक्षित वर्गाच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या पदांसाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गासाठी अर्ज फी ₹१,१८० आहे, तर SC, ST आणि PWD उमेदवारांना ₹१७७ फी भरावी लागेल. फीचे पेमेंट ऑनलाइन माध्यमातून करणे आवश्यक आहे.
Union Bank Vacancy अर्ज कसा करावा
उमेदवारांनी यूनियन बँकेच्या संकेतस्थळावरील Careers विभागात जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी आणि अर्ज फी वेळेत जमा करावी. फीशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
हे पण वाचा :- CID Recruitment 2025 | सीआयडीमध्ये होमगार्ड भरती, 12वी उत्तीर्ण असाल तर आताच फॉर्म भरा; रिक्त जागा जाणून घ्या