Vijayakanth Death: तमिळ स्टार विजयकांत यांचे निधन, साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का

Vijayakanth Death: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील फेमस अभिनेता आणि पॉलिटिशियन विजयकांत यांचे गुरुवारी सकाळी निधन (Vijayakanth Death) झाले. अभिनेत्याच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पक्षानुसार कोविड-19 पॉजिटिव टेस्ट नंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मंत्र त्यांना न्यूमोनिया झाल्याचे रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे. अभिनेत्याला चेन्नई येथील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 28 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. विजयकांत यांच्या निधनाच्या बातमीने तमिळ फिल्म इंडस्ट्री आणि त्यांचा पक्ष डीएमडीके सदस्य आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रुग्णालयात करण्यात आले होते भरती

त्यांचा पक्ष डीएमडीके ने दोन दिवसांपूर्वी एक निवेदन जारी केले होते कि विजयकांत यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पक्षाने एका प्रकाशनात म्हंटले आहे कि सुरुवातीच्या टेस्टमध्ये कोरोना व्हायरसची संसर्गाची पुष्टी झाली होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. नंतर त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. याआधी विजयकांत यांना तापाशी संबंधी आजारामुळे 18 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 11 डिसेंबर 2023 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

कमल हासन ने विजयकांत यांच्या निधनावर व्यक्त केला शोक

कमल हासन ने एक्स अकाऊंटवरून विजयकांत यांच्या निधनावर (Vijayakanth Death) दुख व्यक्त केले आहे आणि लांबलचक नोट लिहिली आहे. त्यांनी आपल्या नोटमध्ये लिहिले कि, माझा प्रिय भाऊ नॅशनल एसोसिएशन ऑफ इंडियन सिनेमाचे अध्यक्ष, तमिळ सिनेमामधील प्रतिष्ठित अभिनेता आणि कॅप्टन विजयकांत च्या रुपामध्ये सर्वांचे प्रिय आणि प्रशंसित, त्यांच्या निधनाची बातमी खूपच दुखद आहे. ते प्रत्येक कामामध्ये मानवतेला अंगीकारून जगत होते. त्यांच्या राजनीतिक स्थानने एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केला होता. त्यांनी गरिबांची दीर्घकाळ मदत केली. निडरताचा त्यांची ओळख होती. सिनेमा, राजकारणी, क्रांतिकारी कलाकार विजयकांत नेहमीच आठवणीत राहतील.

विजयकांत यांच्या निधनाने (Vijayakanth Death) चाहत्यांना धक्का

राजकारणी आणि अभिनेता विजयकांत यांच्या निधनाच्या (Vijayakanth Death) बातमीने फक्त स्टार्सची नाही तर त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. चाहते अभिनेत्याला सोशल मिडियावर श्रद्धांजली देत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे कि, हि कॉलीवुडसाठी खूपच वाईट बातमी आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि, आम्ही थलापति चे चाहते तुम्हाला नेहमीच स्मरणात ठेवतील. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि आमच्या हृदयामध्ये नेहमीच जीवात राहाल, कॅप्टन. विजयकांत यांनी सिवप्पू माली, ओम शक्ति, राजनदाई, पोनमाना सेल्वन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

हेही वाचा: प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक साजिद खान यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अयशस्वी