अचानक 20% वाढला Vodafone-Idea चा शेअर, कंपनी संबंधित आली ‘हि’ मोठी बातमी

2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वोडाफोन आइडिया (Vodafone-Idea) च्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिली आहे. शेअर्समध्ये दुपारी 2.30 वाजता 20% अप्पर सर्किट मारले. वास्तविक Vodafone-Idea कंपनीच्या शेअर्समध्ये बल्क डील पाहायला मिळाली.

व्होडाफोन-आयडिया च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्यामुळे शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. आता हा शेअर 20% वाढीसोबत BSE वर 15.90 रुपयांवर पोहोचला आहे, जो याच्या 52 वीक हाय आहे. शुक्रवारी शेअर 13.45 रुपयांवर उघडला आणि हळू हळू शेअरमध्ये खरेदी वाढत गेली आणि अप्पर सर्किट लागले. शेअरहा 52 वीक लो 5.70 रुपये आहे.

मार्केट सुरु होताच Vodafone-Idea शेअरमध्ये तेजी

Vodafone-Idea मध्ये सकाळपासून आतापर्यंत अनेक मोठे सौदे झाले. Vodafone Idea च्या 16.05 करोड शेअर्समध्ये आज मोठी डील झालं. या लार्ज ट्रेड डीलची व्हॅल्यू 233 कोटी रुपये आहे. कंपनीची निधी उभारण्याची अंतिम मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. मात्र तरीही कंपनीची अनेक बँकांशी चर्चा सुरू आहे.

Vodafone-Idea

शिवाय कंपनी व्यवस्थापन 5G रोलआउटसाठी विक्रेत्यांशीसोबत चर्चा करत आहे. काम्पी आपले कर्ज देखील कमी कार्नायचा प्रयत्न करत आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, दूरसंचार विभागाला (DoT) 1,701 कोटी रुपयांचे पेमेंट देखील करण्यात आले, ज्यामुळे गुंतवणूकदारांमधील सेंटीमेंटमध्ये सुधार आला आहे.

वर्षभरावर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

Vodafone-Idea च्या शेअरमध्ये गेल्या 1 महिन्यात 24%, 6 महिन्यात शानदार 113% आणि वर्षभरात 101% तेजी आली आहे. 2007 मध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट झाल्यापासून 2023 हे वर्ष स्टॉकसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. व्होडाफोन आयडिया शेअरच्या किमतीत नुकतीच झालेली वाढ हि कंपनीच्या प्रमोटर्सद्वारे इक्विटी गुंतवणुकीच्या चर्चेदरम्यान आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, व्होडाफोन आयडिया व्यवस्थापनाने सांगितले की प्रमोटर्सद्वारे 2,000 करोड रुपयांची वचनबद्धता डिसेंबर तिमाहीत पूर्ण केल्या पाहिजेत.

हेही वाचा: Trident Techlabs IPO : ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त क्रेज, आतापर्यंत 121 टक्के भरला इश्यू