7th Pay Commission: केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने महागाई भत्ता (Dearness Allowance) मध्ये वाढ देऊन एक मोठी भेट देऊ शकते. कारण सरकार वर्षामधून दोनवेळा जानेवारी आणि जुलै दरम्यान DA मध्ये वाढ करते. सरकार AICPI आकड्यांनुसार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये वाढ देऊ शकते.
4 टक्क्यांनी DA वाढवला तर किती होईल महागाई भत्ता?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासोबत सरकार पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीमध्ये देखील वाढ करते. DA आणि DR मध्ये हि वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकांच्या मंथली पेन्शनवर थेट परिणाम करते. सध्या सातव्या वेतन आयोगा अंतर्गत (7th Pay Commission) कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 46 टक्के DA आणि DR दिला जात आहे. सरकारने महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला तर तो 46 टक्क्यांवरून 50 टक्के होईल.
कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल?
केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत DA आणि DR 50 टक्क्यांपर्यंत वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 9000 रुपयांनी वाढणार आहे. सरकार ही वाढ जानेवारी ते फेब्रुवारी किंवा मार्चनंतर करू शकते.
50 टक्क्यांनंतर DA शून्य होईल (7th Pay Commission)
2016 मध्ये जेव्हा सरकारने 7 वा वेतन आयोग लागू केला, तेव्हा महागाई भत्ता शून्यावर आणला होता. नियमांनुसार, महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल. यासोबतच 50 टक्के आधारावर मिळणारा DA मूळ वेतनात जोडला जाईल. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही वाढ होणार आहे. समजा एखाद्याचा मूळ पगार 18 हजार रुपये असेल तर त्यात 9000 रुपये जोडले जातील. यानंतर महागाई भत्ता वेगळा दिला जाईल.
या लोकांसाठी महागाई भत्ता वाढला
केंद्र सरकारने अलीकडेच सहाव्या वेतन आयोग आणि पाचव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात वाढ केली होती. ही वाढ 1 जुलै 2023 पासून लागू झाली होती. याशिवाय अनेक राज्यांनी त्यांचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली आहे.