UIDAI New Rules: जर बर्थ सर्टि फिकेट म्हणून आधार कार्डचा वापर करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. आता बर्थ डेट म्हणून आधार कार्ड वापरता येणार नाही. UIDAI कडून नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोणत्याही कामामध्ये आधार कार्डवर लिहिलेली तारीख जन्म तारीख म्हणून लागू होणार नाही. संबंधित कागदपत्रांसह जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. त्यानंतरच संबंधित कागदपत्रे आणि अर्ज वैध होतील.
1 डिसेंबरपासून लागू होणार UIDAI चा नियम
1 डिसेंबरपासून नवीन नियम लागू करण्यात आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने या संदर्भात आदेश जरी केला आहे. आधारमध्ये जन्म तारीख बदलून तारीख, महिना आणि वर्ष इत्यादी बदलून होणारे फ्रॉड थांबवण्यासाठी हे पाउल उचलण्यात आले आहे. नवीन तयार करण्यात येत असलेल्या आधार कार्डमध्ये देखील याला जन्मतारीख म्हणून त्याचा वापर न करण्याची सूचना आधार कार्डवर नमूद करण्यात येत आहे. नवीन आधार कार्ड डाउनलोड करताना याबद्दल माहिती लिहिली जाईल.
पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
नवीन नियमानुसार तुम्हाला आधार कार्डसोबत जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागेल. आधार प्रकल्पाचे उपसंचालक राकेश वर्मा यांनी सांगितले की, नवीन नियमांमुळे कॉलेजमध्ये प्रवेश असो किंवा पासपोर्ट बनवताना आधारचा वापर सर्वत्र केवळ ओळख दस्तऐवज म्हणून केला जाईल. जन्मतारखेच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
का बदलला नियम
आधारमध्ये जन्मतारीख आणि नाव पुन्हा-पुन्हा बदलून पेन्शन योजना, प्रवेश, क्रीडा स्पर्धा आदींसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फ्रॉड करत आहेत. मात्र यूआयडीएआयकडून (UIDAI) अनेकवेळा यासाठी काळजी घेण्यात आली, पण यामध्ये यश मिळाले नाही. यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. आधार प्रोजेक्टची सुरुवात 2009 मध्ये झाली होती. नंतर आधार कार्ड एक विशिष्ट ओळखपत्र म्हणून मानले गेले आणि सर्व सुविधांसोबत जोडले गेले होते. ज्याच्याजवळ आधार कार्ड नव्हते त्याला सरकारी योजनांचा लाभ मिळू शकत नाही.
काय होईल अडचण
नियमात बदल केल्यामुळे आधारमध्ये जन्मतारखेला मान्यता न दिल्यामुळे आता मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता हा प्रश्न आहे कि पेन्शन योजना सहित अनेक योजना आणि अशी कामे जिथे लोकांकडे जन्म प्रमाणपत्र नाही, त्यांचे काय होईल? मोठ्या संख्येमध्ये असे लोक आहेत ज्यांच्याजवळ वयाचे प्रमाणपत्र नाही. अधिक योजनांसोबत जोडलेला जनाधार आहे आणि याला फक्त आधार कार्डसोबतच बनवले जाऊ शकते.