Ind vs Pak Live U19 Asia cup 2023: अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा आठ गडी राखून पराभव केला आहे. दुबईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषकामध्ये भारताने नऊ विकेट्स गमावून पाकिस्तानला 259 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 47 षटकांमध्ये दोन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. पाकिस्तानच्या अझान अवेसने नाबाद 105 धावांची खेळी केली तर कर्णधार साद बेगने 69 धावा बनवल्या. दरम्यान सामन्यामध्ये एक हैराण करणारा कॅच पाहायला मिळाला.
Ind vs Pak Live – असा कॅच कधीच पाहिला नसेल
भारताच्या फलंदाजीदरम्यान (Ind vs Pak Live) पाकिस्तानचा विकेटकीपर साद बेगने असा कॅच पकडला कि फलंदाजाला विश्वासच बसला नाही. 32 व्या षटकादरम्यान गोलंदाज अराफात मिन्हासने ऑफ-स्टंपच्या बाहेर एक फ्लाइटेड चेंडू टाकला. या चेंडूवर आदर्श शिंहने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅटची आतली कडा घेऊन चेंडू विकेटकीपर जवळ गेला. चेंडू खूपच खाली असल्यामुळे बेगने हुशारीने पायामध्ये पकडला. नंतर चेंडू हातामध्ये घेऊन बेगने अपील केली. हे दृश्य पाहून आदर्शला विश्वासच बसला नाही. अंपायर देखील चकित होऊन पाहू लागले. तथापि अंपायरने आदर्शला आउट म्हणून घोषित केले.
शेवटच्या षटकांमध्ये सचिन धसने केलेल्या 42 चेंडूत 58 खेळीवर भारताला 50 षटकांत नऊ विकेट्सच्या मोबदल्यात 259 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार उदय शरण (98 चेंडूत 60 धावा) आणि सलामीवीर आदर्श सिंग (62 धावा, 81 चेंडू) यांनी 20 षटकात 93 धावांची भागीदारी केली, पण धावगती वाढवण्यात अपयश आले. मुशीर खान (02) पहिल्या सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही.
पाकिस्तानची उत्कृष्ट फलंदाजी
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज अझानच्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकिस्तानने 47 षटकांत 2 गडी गमावत 263 धावा करून भारताचा पराभव केला. अजानने 130 चेंडूत 105 धावा केल्या. अजानने सलामीवीर शैजाब खान (88 चेंडूत 63 धावा) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 110 धावा आणि साद बेग (51 चेंडूत 68 धावा) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी अवघ्या 19.1 षटकामध्ये केली. (Ind vs Pak Live) भारतीय कर्णधार उदयने सात गोलंदाजांचा वापर केला मात्र ऑफस्पिनर मुरुगन अभिषेकने घेतलेल्या दोन विकेट्स शिवाय इतर कोणालाहि विकेट्स घेण्यात यश मिळवता आले नाही.
उपांत्य फेरीसाठी भारताला विजय आवश्यक
भारत आपला शेवटचा साखळी सामना मंगळवारी नेपाळविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकले आवश्यक आहे. भारताला विजय मिळवणे कठीण नाही, कारण नेपाळ तितका मजबूत संघ नाही. नेपाळ संघाला दोन्ही सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली आहे.
Also Read: T20 सिरीज गमावल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत झाली भावूक, यांच्यावर फोडले पराभवाचे खापर