Big Boss 17: आयशा खानने मुनव्वर फारुकीवर केला गंभीर आरोप, म्हणाली; ‘एकाच वेळी दोन मुलींसोबत’

Big Boss 17: प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकी सध्या बिग बॉस 17 मुळे खूपच चर्चेमध्ये आहे. मुनव्वर मास्टरमाइंड पद्धतीने गेम प्ले करत आहे. जिंकण्यासाठी मुनव्वर प्रत्येक युक्तीची अवलंब करत आहे. घरामध्ये कधी तो एखाद्याचा मित्र बनतो तर एखाद्याचा शत्रू. मुनव्वर त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये असतो. घरामध्ये तो अनेकवेळा पर्सनल लाईफमुळे इमोशनल झालेला पाहायला मिळाला आहे. मुनव्वर नाजिला सिताशी सोबत ओपेन रिलेशनशिपमध्ये सध्या खूपच चर्चेमध्ये आहे.

Big Boss 17 – मुनव्वरवर डबल डेटिंगचा गंभीर आरोप

फेमस इन्फ्लुएंसर आयशा खान मुनव्वर फारुकीवर डबल डेटिंगचा आरोप लावला आहे. आयशाने नुकतेच एका पॉडकास्टमध्ये मुनव्वरबद्दल अनेक गुपिते उघड केली. आयशाचा व्हिडीओ द खबरी या फॅन पेजवर शेयर करण्यात आला आहे. यादरम्यान आयशा सांगते कि, बिग बॉसमध्ये यावेळी एक कंटेस्टेंट्स आहे, ज्याने तिला एक म्यूजिक व्हिडीसाठी मेसेज केला होता. मी त्याला ओळखत होते, यामुळे मी म्यूजिक व्हिडीओसाठी हो म्हंटलं. व्हिडीओ तर झाला नाही पण तो माझ्या प्रेमात पडला. त्याने म्हंटले कि तो माझ्यावर प्रेम करत आहे. हळू हळू मी देखील त्याला पसंद करू लागले.

आधीपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे मला माहित होते

आयशा पुढे म्हणते कि, यानंतर आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आलो. मला माहित होते कि तो रिलेशनशिपमध्ये आहे, पण त्याने मला म्हंटले कि त्याचे ब्रेकअप झाले आहे. यानंतर जेव्हा तो बिग बॉसमध्ये गेला तेव्हा मी त्याचा फोटो गर्लफ्रेंडसोबत सोशल मिडियावर पाहिला. यानंतर मी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलले आणि मला समजले कि जेव्हा तो बिग बॉसमधून (Big Boss 17) बाहेर येईल तेव्हा दोघे लग्न करणार आहेत. हि गोष्ट माझ्यासाठी शॉकिंग होती. संपूर्ण संभाषणामध्ये तिने मुनव्वरचे नाव घेतले नाही पण द खबरी ने व्हिडीओ शेयर करताना त्याचे नाव शेयर केले आहे.

Also Read
==> Mukti Mohan Wedding: अभिनेता कुणाल ठाकूरसोबत विवाहबंधनात अडकली मुक्ती मोहन, सोशल मिडियावर फोटोज व्हायरल

Leave a Comment