Gold-Silver Price Today: तज्ज्ञांच्या मते, एकेकाळी 60 हजार रुपये प्रती 10 ग्रॅम सोने आता आणखी महाग झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. नुकतेच सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली होती. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा सोन्याचा लेटेस्ट दर जरूर चेक करा. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये (Gold-Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली होती. सोन्याच्या दर 3000 रुपयांनी घसरला होता. सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅम 60,000 रुपये इतका झाला होता. पण आता सोन्याच्या दरामध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे.
चांदीचा जागतिक दर
सोन्याच्या दरासोबत चांदीच्या जागतिक दरामध्ये देखील शुक्रवारी सकाळी वाढ दिसून येत आहे. कॉमेक्स वर चांदीचे फ्युचर्स 0.10 टक्के किंवा 0.02 डॉलरच्या वाढीसह 24.41 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करताना दिसून येत आहे. तर चांदीचा जागतिक स्पॉट दर 24.12 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करताना दिसून आला.
सोन्याची जागतिक किंमत
शुक्रवारच्या सकाळी सोन्याच्या जागतिक दारामध्ये देखील तेजी पाहायला मिळत आहे. कॉमेक्सवर सोन्याचा फ्युचर्स दर 0.31 टक्के किंवा 6.30 डॉलरच्या वाढीसह 2051.20 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करताना दिसत आहे. त्याच वेळी, सोन्याचा जागतिक स्पॉट दर सध्या प्रति औंस 2035.41 डॉलर वर ट्रेड करताना दिसत आहे.
काय आहे चांदीची किंमत
एमसीएक्स एक्सचेंजवर शुक्रवारीच्या सकाळी 5 मार्च 2024 ची डिलिव्हरीवाली चांदी वाढीसोबत 75,959 रुपये प्रति किलोग्राम पर उघडली आहे. तर 3 मे 2024 ची डिलिव्हरीवाली चांदी आज 75,960 वर उघडली आहे.
काय आहेत सोन्याचे भाव – Gold-Silver Price Today
एमसीएक्स एक्सचेंज आज शुक्रवारीच्या सकाळी 5 फेब्रुवारी 2024 डिलिव्हरीवाले सोने वाढीसोबत 62,479 रुपये प्रती 10 ग्रॅमवर उघडले. गुरुवारी संध्याकाळी सोने 62,454 रुपयांवर बंद झाले होते. तर 5 एप्रिल 2024 चे डिलिव्हरीवाले सोने आज उसळी घेत 62,955 रुपयांचे उघडले.