Animal Box Office Collection Day 15: बॉक्स ऑफिसवर आज इतक्या करोडची कमाई करू शकतो चित्रपट

Animal Box Office Collection Day 15: बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा 2023 मधील डंकी चित्रपट 21 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे, तर प्रभास सालार 22 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण याआधी रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यांचा अ‍ॅनिमल चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत करत आहेत. 14 दिवसांमध्ये भारत आणि वर्ल्डवाइड अ‍ॅनिमल चित्रपटाचे कलेक्शन प्रत्येक दिवशी वाढतच चालले आहे. इतकेच नाही तर विकेंडपर्यंत हि कमाई 1000 करोडच्या जवळ जाऊ शकते.

14 दिवसांमध्ये अ‍ॅनिमलची कमाई

बॉक्स ऑफिसवर ट्रॅकर सकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, अ‍ॅनिमलने 14 व्या दिवशी गुरुवारी 8.75 करोडचा बिजनेस केला, यानंतर भारतामध्ये अ‍ॅनिमलचे कलेक्शन 476.84 करोड झाले आहे. वर जगभरात हा आकडा 780 कोटींच्या पुढे फक्त काहीच आकडे दूर आहे. चित्रपटाचे बजेट फक्त 100 कोटी रुपये आहे.

Animal Box Office Collection

13 व्या दिवसाच्या कमाईबद्दल (Animal Box Office Collection) बोलायचे झाले तर अ‍ॅनिमलने पहिल्या दिवशी 63.8 करोड, दुसऱ्या दिवशी 66.27 करोड, तिसऱ्या दिवशी 71.46 करोड, चौथ्या दिवशी 43.96 करोड, पाचव्या दिवशी 37.47 करोड, सहाव्या दिवशी 30.39 आणि सातव्या दिवशी 24.23 करोडची कमाई केली होती, ज्यामुळे आठवड्याचे कलेक्शन 337.58 करोड पर्यंत पोहोचले. तर चित्रपटाने आठव्या दिवशी 22.95 करोड, नवव्या दिवशी 34.74 करोड, दहाव्या दिवशी 36 करोड, अकराव्या दिवशी 13.85 करोड, 12 व्या दिवशी 12.72 करोड आणि तेराव्या दिवशी 10.25 करोड कमाई केली आहे.

Animal Box Office Collection Day 15

Animal Box Office Collection

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जबरदस्त कमाई सुरूच असून चित्रपट पंधराव्या दिवशी जवळ जवळ 8 करोडच्या आसपास कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. आता चित्रपट पंधराव्या दिवशी कमाई करतो याचा खुलास आकडेवारी समोर आल्यावरच समजेल.

Also Read: ओटीटी वर लवकरच पाहायला मिळणार रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट, या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Leave a Comment