Kisan Vikas Patra: सध्या आपल्याला अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार त्यांच्या गरजेनुअर इन्वेस्टमेंट प्रोडक्टची निवड करतात. जर तुम्ही देखील गुंतवणूकीच्या तयारीमध्ये असाल तर तुम्ही किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ची निवड करू शकता. यामध्ये खात्रीशीर पर्ताव्यासोब्त अनेक फायदे देखील मिळतात. किसान विकास पत्र, सामान्यत: KVP म्हणून ओळखले जाते, पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या सर्वोत्तम लहान बचत योजनांपैकी हि एक योजना आहे. सध्या, KVP दरवर्षी 7.5% चक्रवाढ व्याज देत आहे.
Kisan Vikas Patra साठी अर्ज कसा करावा
किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला योग्यरीत्य फॉर्म भरून पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सबमिट करावा लागेल. यासाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. तुम्हाला आयडी आणि अॅड्रेस प्रूफ कॉपी (पॅन, आधार, मतदार आयडी, ड्रायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट) सबमिट करणे आवश्यक आहे. यानंतर, कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला पैसे जमा करावे लागतील. तुम्ही रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा करू शकता. रोख रकमेच्या बाबतीत, तुम्हाला लगेच KVP प्रमाणपत्र मिळेल. तुम्हाला ते सुरक्षित ठेवावे लागेल कारण तुम्हाला ते मॅच्युरिटीच्या वेळी जमा करावे लागेल.
Kisan Vikas Patra मध्ये मिळणारे फायदे
बाजारातील चढउतारामध्ये द्केहील तुम्हाला पैशांची हमी मिळते. हि एक सुरक्षित गुंतवणूक आहे आणि बाजाराच्या जोखमीच्या अधीन नाही. KVP खाते किमान 1,000 आणि त्यानंतर 100 च्या पटीत उघडले जाऊ शकते. याला कमाल मर्यादा नाही. KVP खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. किसान विकास पत्राचा मॅच्युरिटी 115 महिने आहे. तुम्ही रक्कम काढेपर्यंत KVP च्या मॅच्युरिटी रकमेवर व्याज जमा होत राहील. कर्ज मिळविण्यासाठी तुम्ही तुमचे KVP प्रमाणपत्र संपार्श्विक किंवा सुरक्षा म्हणून वापरू शकता. यामध्ये नामांकन सुविधा उपलब्ध आहे. आयकर कायद्याच्या कलम 194A च्या तरतुदींनुसार, KVP च्या मॅच्युरिटीवर, व्याज उत्पन्नातून कोणताही कर वजा करणे आवश्यक नाही.
गुंतवणुकीसाठी पात्रता
किसान विकास पत्र मध्ये गुंतवणुकीसाठी 18 वर्षापेक्षा जास्त वय असणे अनिवार्य आहे. एक प्रौढ व्यक्ती एखाद्या नाबालिक विकलांग व्यक्तीसाठी अर्ज करू शकतो.
हेही वाचा
==> History of Arjan Vailly: कोण होते अर्जन वैली, ज्यांच्यावर सुपरहिट झाले ‘Animal’ चे गाणे